TRENDING:

गुरं चारायला आलेली कन्या गायब अन् रक्ताची धार, विदर्भातील देवीची अनोखी आख्यायिका

Last Updated:

विदर्भातील एका ओसाड माळावर नरसाई देवीचं मंदिर आहे. या मंदिराबाबत एक अनोखी आख्यायिका सांगितली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 11 ऑक्टोबर: काही दिवसांत शक्ती देवतेचा उत्सव मानल्या जाणाऱ्या नवरात्री उत्सवास सुरुवात होत आहे. देशभर विविध ठिकाणी देवीची मंदिरे असून या मंदिरांचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच प्रत्येक मंदिराबाबत एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. असंच एक मंदिर विदर्भातील वर्धा - आर्वी मार्गावर असणाऱ्या एका टेकडीवर आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात आंजी (मोठी) येथील नरसाई माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
advertisement

वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथे ओसाड टेकडीवर नरसाई माता देवस्थान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जागृत देवस्थान अशी या मंदिराची ओळख आहे. त्यामुळेच या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्यात आलंय. विशेष म्हणजे गाभाऱ्याचा भाग काचांनी सजवण्यात आलाय. त्यामुळे मंदिर अत्यंत आकर्षक दिसतंय. गाभाऱ्यात नरसाई देवी स्थानापन्न असून मंदिराच्या सभोवती नऊ दुर्गांच्या प्रतिमा आहेत.

advertisement

अंदाजे 150 वर्ष पूर्वीची आख्यायिका

नरसाई मंदिराबाबत गावकरी एक आख्यायिका सांगतात. 150 वर्षांपूर्वी आंजी (मोठी) या गावातील ओसाड टेकडीवर एकदा एक 9 वर्षाची कन्या गुरे चारण्यासाठी आली. तेव्हा ती अचानक लुप्त झाली. ती कोणालाही दिसेना. तिचं नाव नरसाई होतं. ती लुप्त झाली त्याठिकाणून रक्ताची धार गावकऱ्यांना दिसली. त्याची प्रचिती गावकऱ्यांना आली. श्रद्धा भावनेने गावकऱ्यांनी याच टेकडीवर छोटस मंदिर तयार करून त्या ठिकाणी रक्ताळलेल्या दगडाची पूजा होऊ लागली, असं मंदिर उपाध्यक्ष किशोर भांदककर सांगतात.

advertisement

..तेव्हा गाढवासारखं ओरडायची देवी, विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी माता माहितीये का? Video

कालांतराने या ठिकाणाची व्याप्ती आणि महिमा वाढत गेली. त्यामुळे महाराष्ट्रच नाही तर छत्तीसगड, मध्यप्रदेश येथून भाविक नरसाई मातेच्या दर्शनाला या ठिकामी येऊ लागले. ज्या ठिकाणी नरसाई लुप्त झाली त्याच ठिकाणी हे मंदिर असून या टेकडीला नरसाई माता गड म्हणून ओळखलं जातं.

advertisement

सयाजी महाराजांच्या पुढाकाराने जिर्णोद्धार

पूर्वी मंदिर अतिशय छोटं होतं आणि परिसरही फारसा स्वच्छ नव्हता. सन 1987 पासून वर्ध्यातील पिंपळगाव भोसले येथील श्री संत सयाजी महाराज यांच्या पुढाकाराने या मंदिराचा कायापालट आणि जीर्णोद्धार झाला. त्यानंतर शासकीय दरबारी या मंदिराची दखल घेतली गेली आणि पुढील विकास झाला. आता या मंदिरात दुरवरून भाविक येतात. नवरात्रांत मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. नऊ दिवस उत्सव, होम हवन, गरबा, दुधाचा लंगर, जेवण असा उत्सव साजरा केला जातो, असेही भांदककर सांगतात.

advertisement

हनुमान आणि दुर्गामाता एकत्र, कसं आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर?

एकेकाळी होता मांसाहार

एकेकाळी या ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जायचा. मात्र श्री संत सयाजी महाराजांच्या पुढाकाराने ती प्रथा हळूहळू बंद झाली. आता देवीला पुरणाचा आणि रोगडे नैवेद्य दाखवला जातो. असे मंदिर संथापक सयाजी महाराजांनी सांगितले. देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते ते या ठिकाणी भव्य महाप्रसाद करतात. त्यासाठी येथे शेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शुभ कार्यासाठी हॉलचीही व्यवस्था आहे.

नरसाई गड अनेकांचे श्रद्धास्थान

वर्धा-आर्वी मार्गावर मंदिर असल्यामुळे अनेक प्रवासी या मंदिरात देवीसमोर नतमस्तक होऊन पुढील प्रवास करतात. मंदिर परिसर अतिशय रमणीय असून मंदिराच्या टेकडीवरून परिसरातील हिरवळ भाविकांना अधिकच प्रसन्न करते. याठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतो. नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांकरिता गावकरीही एकत्रित येतात. देवीकडे मनोभावे प्रार्थना केली, नवस केला की देवी नवस पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
गुरं चारायला आलेली कन्या गायब अन् रक्ताची धार, विदर्भातील देवीची अनोखी आख्यायिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल