TRENDING:

परळी वैद्यनाथाशी विवाह करण्यासाठी कोकणातून आली देवी, पण अंबाजोगाईत... Video

Last Updated:

कोकण वासियांची कुलस्वामिनी योगेश्वरी देवी अंबाजोगाईत कशी आली? याबाबत एक आख्यायिका आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, 11 ऑक्टोबर: महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध देवी देवतांची मंदिरे आहेत. मराठवाड्यातील अंबाजोगाई येथे योगेश्वेरी देवीचं प्राचीन मंदिर आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात बीडमधील अंबाजोगाईत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोकणवासियांची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी राज्यातून आणि परराज्यातूनही भक्त येत असतात. कोकणातील देवी अंबाजोगाईत कशी आली? याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. याबाबत सारंग पुजारी यांनी माहिती दिली आहे.
advertisement

अंबाजोगाईतील प्रसिद्ध मंदिर

बीड जिल्ह्यातील जयंती नदीच्या काठी अंबाजोगाई हे गाव वसलेलं आहे. याच अंबाजोगाईत अनेक प्राचीन आणि धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली मंदिरे आहेत. योगेश्वरी देवीचे मंदिर देखील प्राचीन असून अनेकांचं श्रद्धास्थान आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा आणि नवरात्र उत्सवा काळामध्ये या ठिकाणी भक्तांची मोठी रिघ दिसून येते. मंदिर बाराव्या शतकातील असून हे ते पूर्णपणे दगडी शिल्पात आहे.

advertisement

..तेव्हा गाढवासारखं ओरडायची देवी, विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी माता माहितीये का? Video

कोकणातील देवी अंबाजोगाईत

योगेश्वरी देवी ही कोकण वासियांची कुलस्वामिनी आहे. ही देवी अंबाजोगाई येथे कशी आली याबाबत सारंग पुजारी यांनी एक आख्यायिका सांगितली आहे. त्यानुसार "अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे. परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात गेली नाही. देवी ज्या ठिकाणी राहिल ते आजचे आंबाजोगाई होय. 11 व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले."

advertisement

हनुमान आणि दुर्गामाता एकत्र, कसं आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर?

अंबाजोगाई यादव कालीन शहर

अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे. यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, नंतर निजाम अशा विविध राजयकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले आहे. जयंती नदीच्या पश्चिम तटावर अंबेचे मंदिर आहे. मंदिराला तटबंदी असून उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. देवीचे मंदिर यादवकाळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही झालेला दिसतो.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
परळी वैद्यनाथाशी विवाह करण्यासाठी कोकणातून आली देवी, पण अंबाजोगाईत... Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल