भारतात प्रसिद्ध असलेले कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिर पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे 4 पासून रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा भाग म्हणून बहुतांश शिवमंदिरांमध्ये दीप अमावास्येपासूनच मंदिरांचे आवार विद्युत रोषणाईने झळाळून निघाले आहे.
advertisement
पहाटे 5 वा महारुद्राभिषेक
श्रावण सोमवारी कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिरात पहाटे 5 वाजता महारुद्राभिषेक, महापूजन आणि महाआरती आदी धार्मिक उपक्रमांनंतर नित्यसेवेस सुरुवात होणार आहे. कपालेश्वर मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या ठिकाणी गर्दी करू नये, असे मंदिर ट्रस्टींनी आवाहन केले आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद
12 जोतिर्लिंगांपैकी एक नाशिकमध्ये असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे श्रावणात पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. गर्दीत गैरसोय होऊ नये याकरता गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवारी सर्व व्हीआयपी दर्शन बंद करण्यात येणार आहे. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.