Tulja Bhavani Mandir: श्रावणात बदलला कोरोनातला निर्णय, तुळजाभवानी मंदिरात 5 वर्षानंतर पुन्हा प्रसादाचे वाटप
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Tulja Bhavani Temple: महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मंदिरातून भाविकांसाठी आनंदवार्ता आहे. भाविकांना तब्बल 5 वर्षानंतर बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे.
धाराशिव: महाराष्ट्राचे कुलदैवत कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. भाविकांना प्रसाद म्हणून पुन्हा एकदा बुंदीचे लाडू मिळणार आहेत. कोविडपासून बुंदीच्या लाडूंचा प्रसाद बंद होता. आता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने तब्बल 5 वर्षानंतर सशुल्क लाडू प्रसाद वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाविकांना प्रति लाडू 30 रुपये देऊन प्रसाद घेता येईल.
तुळजाभवानी मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणारा बुंदी लाडू आता पुन्हा एकदा पूर्ववत वितरित होणार आहे. यासाठी 25 जुलै रोजीचा मुहूर्त साधला असून, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांना सशुल्क लाडूचा प्रसाद देणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली. यापूर्वी तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात येत होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्रसादाचे वितरण थांबवण्यात आले. हा प्रादुर्भाव संपल्यानंतरही प्रसाद बंदच होता.
advertisement
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मंदिर प्रशासनाने यासंदर्भात निविदा मागवल्या होत्या. यात पुणे येथील मिठाई व्यापारी चितळे बंधूंना लाडू वितरणाचे हक्क देण्यात आले आहेत. 25 जुलै रोजी सकाळी अधिकृतरीत्या लाडू प्रसाद वितरणाचे उद्घाटन मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे.
advertisement
50 ग्रॅमचा लाडू 30 रुपयांना
शुक्रवारपासून वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादाचा लाडू हा शुद्ध तुपातील असणार आहे. त्याचे वजन 50 ग्रॅम इतके राहणार असून, त्यासाठी भाविकांना प्रतिलाडूला 30 रुपये मोजावे लागणार आहेत.
Location :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
July 25, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/Temples/
Tulja Bhavani Mandir: श्रावणात बदलला कोरोनातला निर्णय, तुळजाभवानी मंदिरात 5 वर्षानंतर पुन्हा प्रसादाचे वाटप