advertisement

Thane Traffic: महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा कोणते रस्ते बंद, सुरू?

Last Updated:

ठाणे वाहतूक पोलिसांकडून ठाणेकरांसाठी परिपत्रक जारी करून 'महाशिवरात्री' निमित्त शिवभक्तांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

thane mahashivratri 2026 traffic will be diverted near nandi baba temple on kolshet Kapoor bawadi road from 15th to 19th february 2026
thane mahashivratri 2026 traffic will be diverted near nandi baba temple on kolshet Kapoor bawadi road from 15th to 19th february 2026
ठाणे: महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये 'महाशिवरात्री' उत्सव साजरा केला जातो. मुंबईसह ठाण्यातही शिवशंकराचे प्रमुख मंदिर आहेत. ठाण्यामध्ये नंदीबाबा मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मंदिरामध्ये होणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. अलीकडेच ठाणे वाहतूक पोलिसांकडून ठाणेकरांसाठी परिपत्रक जारी करून भक्तांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. 15 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत नंदीबाबा मंदिर परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, या दृष्टीने पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कापूरबावडी वाहतूक उपविभागच्या ह‌द्दीत दिनांक: 15- 02- 2026 ते दिनांक: 19- 02- 2026 या तारखेदरम्यान महाशिवरात्री निमित्त नंदीबाबा मित्र मंडळातर्फे महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येतो. नदीबाबा मंदिरामध्ये दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता मंदीर परिसरात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंदिर परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी बंद मार्ग कोणते आहेत आणि त्यासाठी पर्यायी मार्ग कोणते असणार? याबद्दलची माहिती दिली आहे.
advertisement
कोणकोणत्या मार्गावर असणार बंदी, पर्यायी मार्ग कोणते
1) माजीवडा मानपाडा प्रभाग समिती समोरून कोलशेतकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना माजीवडा मानपाडा प्रभाग समिती समोर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. त्यासाठी माजीवडा मानपाडा प्रभाग समिती समोरून कोलशेतकडे जाणाऱ्या मार्गावरुन सर्व प्रकारची वाहने पुढे जावून कापुरबावडी सर्कल पासून उजवीकडे वळण घेवून तत्वज्ञान विद्यापीठामार्गे ब्रम्हांड किंवा आर मॉल मार्गे तुम्ही इच्छित स्थळी जावू शकता. आणखी एक पर्यायी मार्ग असेल. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती समोरून कोलशेतकडे जाणाऱ्या मार्गावरुन सर्व प्रकारची वाहने ही सरळ पुढे जाऊन बाळुकम नाका मार्गे दादलानीकडे जाणाऱ्या चौकातून डावीकडे वळण घेऊन राममारुती रोडने किंवा दोस्ती कौटी गेटमधून किंवा पुढे जाऊन पाईप लाईन मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकता.
advertisement
advertisement
2). कोलशेत कडुन कापुरबावडी सर्कल तसेच माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ढोकाळी सिग्नल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. यासाठी सर्व वाहनधारकांना आपले वाहनं हे उजवीकडे वळण घेवून, मनोरमा नगर मार्गे अथवा लोढा अमाराकडुन लोढा बिझनेस डिस्ट्रीक समोरून ब्रम्हांड मार्गे इच्छित स्थळी घेऊन जावे लागेल.
advertisement
3). घोडबंदर- ठाणे मुख्य वाहिनीवरून नळपाडा सिग्नलवरून डावीकडे वळण घेऊन डी- मार्ट समोरून कोलशेतकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर मॉल जवळ 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. यासाठी सर्व वाहन धारकांना आपले वाहनं आर मॉल येथून डावीकडे वळण घेऊन मनोरमा नगर येथून पुढे सरळ जाऊन डोकाळी सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन, इच्छित स्थळी नेऊ शकतात.
advertisement
4) घोडबंदर- ठाणे वाहिनी आर मॉल सर्व्हिस रोडने सरळ येवून हॉटेल विहंग इन येथून डावीकडे वळण घेऊन पुढे सरळ येऊन जोधपूर स्विट्स येथून डावीकडे वळण घेऊन कोलशेतकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना आर मॉल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. यासाठी सर्व वाहन धारकांना आपले वाहनं आर मॉल येथून डावीकडे वळण घेऊन मनोरमा नगर येथून पुढे सरळ जाऊन ढोकाळी सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन, इच्छित स्थळी जाता येणार आहे.
advertisement
सर्व वाहन धारकांसाठी प्रवेश बंदी आणि पर्यायी मार्गांचा वापर दिनांक: 15-02-2026 ते 19-02-2026 या तारखे दरम्यान सायंकाळी 05:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत करावा लागणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी दिलेले हे नियम पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Traffic: महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा कोणते रस्ते बंद, सुरू?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement