advertisement

Lice : डोक्यांमधील उवांमुळे चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय आणि कसं घडलं? समोर आला धक्कादायक प्रकार

Last Updated:
12 वर्षांच्या लक्ष्मीप्रिया साहू या मुलीचा उवांमुळे झालेल्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण यामागचे वैद्यकीय वास्तव अत्यंत भयंकर आहे.
1/7
लहान मुलांच्या केसात उवा होणे ही आपल्याकडे अगदी सामान्य बाब मानली जाते.
लहान मुलांच्या केसात उवा होणे ही आपल्याकडे अगदी सामान्य बाब मानली जाते. "शाळेत गेल्यावर उवा होतातच", असं म्हणून अनेक पालक याकडे दुर्लक्ष करतात किंवा घरगुती तेल, शॅम्पू वापरून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण हीच छोटीशी वाटणारी समस्या एखाद्या चिमुरडीचा जीव घेऊ शकते, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल.
advertisement
2/7
ओडिशामधून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने आता वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडवून दिली आहे. 12 वर्षांच्या लक्ष्मीप्रिया साहू या मुलीचा उवांमुळे झालेल्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण यामागचे वैद्यकीय वास्तव अत्यंत भयंकर आहे.

3/7
नेमकं काय घडलं?ओडिशाच्या चंपाग्रा भागातील सहावीत शिकणारी लक्ष्मीप्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून डोक्यातील उवांनी त्रस्त होती. तिची आई सत्यभामा यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांनी घरगुती उपाय केले, पण काहीच फरक पडला नाही. उवांमुळे डोक्यातून इतका घाणेरडा वास येऊ लागला होता की, लक्ष्मीप्रियाने शाळेत जाणे बंद केले आणि ती नेहमी डोक्याला ओढणी बांधून राहत असे.

4/7
काही दिवसांपूर्वी अचानक लक्ष्मीप्रियाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी अचानक लक्ष्मीप्रियाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
advertisement
5/7
उवांमुळे मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, पुरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अक्षय शथापती आणि त्वचाविकार तज्ज्ञ सुरजीत गरई यांनी यामागचे धक्कादायक विज्ञान स्पष्ट केले आहे.1. सततची खाज आणि जखमा: उवा डोक्यातील त्वचेतून रक्त शोषतात, ज्यामुळे सतत खाज सुटते. खाजवताना नखांमुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा होतात.
2. लक्ष्मीप्रियाच्या बाबतीत, डोक्याला सतत ओढणी बांधल्यामुळे जखमांना हवा मिळाली नाही आणि तिथे गंभीर संसर्ग झाला. त्यातून डोक्याला दुर्गंधी येऊ लागली.
3. जेव्हा त्वचेवरील हा संसर्ग रक्तामध्ये पसरतो, तेव्हा त्याला 'सेप्टीसीमिया' म्हणतात. हा एक जीवघेणा आजार आहे. रक्तातील या संसर्गामुळे अंतर्गत अवयव निकामी होतात, ज्याचा परिणाम लक्ष्मीप्रियाच्या मृत्यूत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
उवांमुळे मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, पुरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अक्षय शथापती आणि त्वचाविकार तज्ज्ञ सुरजीत गरई यांनी यामागचे धक्कादायक विज्ञान स्पष्ट केले आहे.1. सततची खाज आणि जखमा: उवा डोक्यातील त्वचेतून रक्त शोषतात, ज्यामुळे सतत खाज सुटते. खाजवताना नखांमुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा होतात.2. लक्ष्मीप्रियाच्या बाबतीत, डोक्याला सतत ओढणी बांधल्यामुळे जखमांना हवा मिळाली नाही आणि तिथे गंभीर संसर्ग झाला. त्यातून डोक्याला दुर्गंधी येऊ लागली.3. जेव्हा त्वचेवरील हा संसर्ग रक्तामध्ये पसरतो, तेव्हा त्याला 'सेप्टीसीमिया' म्हणतात. हा एक जीवघेणा आजार आहे. रक्तातील या संसर्गामुळे अंतर्गत अवयव निकामी होतात, ज्याचा परिणाम लक्ष्मीप्रियाच्या मृत्यूत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
advertisement
6/7
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?तज्ज्ञांच्या मते, उवा होणे ही केवळ स्वच्छतेची समस्या नाही, तर ती एक वैद्यकीय स्थिती आहे.
दुर्लक्ष करू नका: जर घरगुती उपायांनी उवा कमी होत नसतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोके झाकून ठेवू नका: संसर्ग झाला असल्यास डोके घट्ट बांधून ठेवल्याने बॅक्टेरिया वेगाने वाढतात.
नखांची स्वच्छता: लहान मुलांची नखे कापलेली असावीत, जेणेकरून खाजवताना जखमा होणार नाहीत.
मानसिक आधार: उवांमुळे मुलांना शाळेत किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये शरम वाटते. अशा वेळी त्यांना रागावण्याऐवजी त्यांच्या समस्येवर योग्य उपचार करा.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?तज्ज्ञांच्या मते, उवा होणे ही केवळ स्वच्छतेची समस्या नाही, तर ती एक वैद्यकीय स्थिती आहे.दुर्लक्ष करू नका: जर घरगुती उपायांनी उवा कमी होत नसतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.डोके झाकून ठेवू नका: संसर्ग झाला असल्यास डोके घट्ट बांधून ठेवल्याने बॅक्टेरिया वेगाने वाढतात.नखांची स्वच्छता: लहान मुलांची नखे कापलेली असावीत, जेणेकरून खाजवताना जखमा होणार नाहीत.मानसिक आधार: उवांमुळे मुलांना शाळेत किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये शरम वाटते. अशा वेळी त्यांना रागावण्याऐवजी त्यांच्या समस्येवर योग्य उपचार करा.
advertisement
7/7
 "फक्त उवाच तर आहेत," असं म्हणून लक्ष्मीप्रियाच्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि आज एक हसती-खेळती मुलगी त्यांच्यात नाही. ही घटना सर्व पालकांसाठी एक मोठा धडा आहे. आरोग्याची कोणतीही तक्रार छोटी नसते, हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement