advertisement

How Middle Class People Become Rich : मध्यमवर्गीय लोक श्रीमंत का होत नाही? वॉरेन बफेट यांनी सांगितल्या 5 मोठ्या चुका

Last Updated:
बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी मध्यमवर्गीयांच्या अशा 5 मोठ्या चुका सांगितल्या आहेत, ज्या टाळल्या तर तुम्हीही श्रीमंतीच्या मार्गावर चालू शकता. चला तर मग, जाणून घेऊया तुमच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या 5 सवयी.
1/8
आपल्यापैकी अनेकांचे एक स्वप्न असतं ते म्हणजे 'आर्थिक स्वातंत्र्य'. म्हणजे असं आयुष्य जिथे पैशांची चिंता नसेल. पण वास्तवात काय होतं? पगार झाला की पहिल्या 10 दिवसांत ईएमआय, बिलं आणि उरलेले खर्च यात सगळा पैसा संपून जातो. आपण कष्ट तर खूप करतो, पण संपत्ती मात्र वाढत नाही. आपण विचार करतो की, कदाचित माझं उत्पन्न कमी आहे, पण जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) यांचं मत वेगळं आहे.

2/8
बफे म्हणतात की, मध्यमवर्गीय माणूस गरीब राहतो कारण तो कमवतो कमी नाही, तर तो 'चुकीच्या' ठिकाणी पैसा घालवतो. बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी मध्यमवर्गीयांच्या अशा 5 मोठ्या चुका सांगितल्या आहेत, ज्या टाळल्या तर तुम्हीही श्रीमंतीच्या मार्गावर चालू शकता. चला तर मग, जाणून घेऊया तुमच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या 5 सवयी.

3/8
1. क्रेडिट कार्डच्या व्याजाचा विळखाबफे यांच्या मते, क्रेडिट कार्ड हे मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठं संकट आहे. जर तुमच्या कार्डवर 18% ते 30% व्याज लागत असेल, तर जगातील कोणतीही गुंतवणूक तुम्हाला त्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाही. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचं क्रेडिट कार्डचं देणं पूर्ण करा. 18% पेक्षा जास्त व्याज देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. या चक्रव्यूहात एकदा अडकलं की बाहेर पडणं कठीण होतं.
1. क्रेडिट कार्डच्या व्याजाचा विळखाबफे यांच्या मते, क्रेडिट कार्ड हे मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठं संकट आहे. जर तुमच्या कार्डवर 18% ते 30% व्याज लागत असेल, तर जगातील कोणतीही गुंतवणूक तुम्हाला त्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाही.कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचं क्रेडिट कार्डचं देणं पूर्ण करा. 18% पेक्षा जास्त व्याज देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. या चक्रव्यूहात एकदा अडकलं की बाहेर पडणं कठीण होतं.
advertisement
4/8
2. 'स्टेटस'साठी नवीन कोरी कार घेण्याची घाईकार हे केवळ वाहतुकीचे साधन आहे, प्रतिष्ठेचे प्रतीक नाही. वॉरेन बफे स्वतः अब्जाधीश असूनही अनेक वर्षे जुनी कार वापरत असत. मध्यमवर्गीय लोक मात्र शेजाऱ्याला दाखवण्यासाठी किंवा स्टेटससाठी कर्जावर महागडी कार घेतात. शोरूममधून कार बाहेर पडताच तिची किंमत 20% ने कमी होते. नवीन कारच्या ईएमआयमध्ये अडकण्याऐवजी तोच पैसा गुंतवला, तर तुमची संपत्ती वेगाने वाढू शकते.
2. 'स्टेटस'साठी नवीन कोरी कार घेण्याची घाईकार हे केवळ वाहतुकीचे साधन आहे, प्रतिष्ठेचे प्रतीक नाही. वॉरेन बफे स्वतः अब्जाधीश असूनही अनेक वर्षे जुनी कार वापरत असत. मध्यमवर्गीय लोक मात्र शेजाऱ्याला दाखवण्यासाठी किंवा स्टेटससाठी कर्जावर महागडी कार घेतात.शोरूममधून कार बाहेर पडताच तिची किंमत 20% ने कमी होते. नवीन कारच्या ईएमआयमध्ये अडकण्याऐवजी तोच पैसा गुंतवला, तर तुमची संपत्ती वेगाने वाढू शकते.
advertisement
5/8
3, लॉटरी आणि जुगारातून 'शॉर्टकट' शोधणेकमी वेळात आणि कमी कष्टांत श्रीमंत होण्याची ओढ मध्यमवर्गीयांना लॉटरी, जुगार किंवा फसव्या योजनांकडे खेचते. नशिबाच्या खेळावर पैसा लावण्यापेक्षा बफे व्यावसायिक मूलतत्वांवर विश्वास ठेवण्यास सांगतात. लॉटरीचे तिकीट स्वस्त वाटत असले तरी, दीर्घकाळात तो वाया जाणारा पैसा आहे. त्याऐवजी अशा व्यवसायात किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करा ज्याचे मूल्य काळानुसार वाढत जाईल.
3, लॉटरी आणि जुगारातून 'शॉर्टकट' शोधणेकमी वेळात आणि कमी कष्टांत श्रीमंत होण्याची ओढ मध्यमवर्गीयांना लॉटरी, जुगार किंवा फसव्या योजनांकडे खेचते. नशिबाच्या खेळावर पैसा लावण्यापेक्षा बफे व्यावसायिक मूलतत्वांवर विश्वास ठेवण्यास सांगतात.लॉटरीचे तिकीट स्वस्त वाटत असले तरी, दीर्घकाळात तो वाया जाणारा पैसा आहे. त्याऐवजी अशा व्यवसायात किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करा ज्याचे मूल्य काळानुसार वाढत जाईल.
advertisement
6/8
4. गरजेपेक्षा मोठे घर आणि मोठे कर्जघर ही राहण्याची जागा आहे, 'इन्व्हेस्टमेंट' नाही. वॉरेन बफे आजही 1957 मध्ये घेतलेल्या त्याच साध्या घरात राहतात. मध्यमवर्गीय लोक मात्र आपली निम्मी कमाई केवळ घराचा ईएमआय भरण्यात घालवतात. मोठे घर घेण्याच्या नादात त्यांच्याकडे संपत्ती निर्माण करण्यासाठी भांडवलच उरत नाही.

7/8
5. आधी खर्च आणि मग बचत करण्याची पद्धतबहुतेक लोक पगार आला की आधी खर्च करतात आणि शेवटी जे उरेल ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. बफे म्हणतात हेच तुमच्या गरिबीचे कारण आहे. बफे यांचा मंत्र साधा आहे
5. आधी खर्च आणि मग बचत करण्याची पद्धतबहुतेक लोक पगार आला की आधी खर्च करतात आणि शेवटी जे उरेल ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. बफे म्हणतात हेच तुमच्या गरिबीचे कारण आहे.बफे यांचा मंत्र साधा आहे "आधी गुंतवणूक करा (बचत करा) आणि मग जे उरेल त्यात तुमचा खर्च भागवा." आजची तात्कालिक समाधान देणारी खरेदी तुमच्या भविष्यातील आर्थिक ओझं बनू शकते, हे विसरू नका.
advertisement
8/8
वॉरेन बफे यांचा हा विचार केवळ पैशांबद्दल नाही, तर तो आपल्या मानसिकतेबद्दल आहे. श्रीमंत व्हायचे असेल तर 'श्रीमंत दिसण्यापेक्षा' 'श्रीमंत असण्यावर' लक्ष केंद्रित करा. या 5 चुका टाळल्या तर तुमच्या कष्टाच्या कमाईला खऱ्या अर्थाने श्रीमंतीची फळं लागतील.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement