जगाचा श्वास रोखला, इराणच्या 'हेवी-वॉटर' रिॲक्टरवर बॉम्ब टाकला; रेडिएशनचा धोका? परिसर रिकामा करण्याचे आदेश
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Attack On Iran Nuclear Facilities: इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यामुळे तणाव तीव्र झाला असून हेवी-वॉटर आणि यलोकेक प्लांट लक्ष्य झाल्याचा दावा केला जात आहे.
तेहरान: इराणवर मोठा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की देशातील अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये हेवी-वॉटर प्लांट आणि यलोकेक उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे. इराणची Fars News Agency या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलने मध्य इराणमध्ये असलेल्या हेवी वॉटर रिएक्टरवर हल्ला केला.
फार्स न्यूज एजन्सीनुसार सेंट्रल मरकजी प्रांतातील अधिकारी हसन गमारी यांनी सांगितले की, खोंदाब हेवी वॉटर कॉम्प्लेक्सवर अमेरिकन आणि इस्रायली शक्तींनी दोन टप्प्यांत हल्ला केला.
हेवी-वॉटर प्लांट आणि यलोकेक उत्पादन प्रकल्प हे दोन्ही अणुऊर्जा कार्यक्रमातील अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. हेवी-वॉटरचा वापर प्रामुख्याने अणुभट्ट्यांमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी केला जातो. तर ‘यलोकेक’ हा युरेनियम धातूपासून मिळणारा प्रारंभिक सघन प्रकार असून तो पिवळसर रंगाचा पावडर असतो. अणुइंधन निर्मितीच्या प्रक्रियेतील ही पहिली पायरी असते. याच यलोकेकवर पुढील प्रक्रिया करून अण्वस्त्र तयार केले जाऊ शकते.
advertisement
हा हल्ला खोंदाब पॉवर प्लांटवर झाला असून सुमारे 10 वेळा हल्ले करण्यात आले. हल्ल्यानंतर परिसरात काळा धूर दिसून आला. मात्र या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच रेडिएशन गळतीबाबतही कोणतीही नोंद झालेली नाही.
खोंदाब पॉवर प्लांट हा इराणच्या मध्य भागात अराक शहराजवळील खोंदाब येथे स्थित आहे. यापूर्वी हा प्रकल्प ‘अराक हेवी वॉटर रिएक्टर (IR-40)’ म्हणून ओळखला जात होता. 2017 मध्ये त्याचे अधिकृत नाव बदलून ‘खोंदाब हेवी वॉटर रिसर्च रिएक्टर’ असे करण्यात आले. हा पारंपरिक वीज निर्मिती प्रकल्प नसून संशोधनासाठी वापरला जाणारा हेवी-वॉटर रिएक्टर आहे. अशा प्रकारचे रिएक्टर नैसर्गिक युरेनियमवर चालतात आणि प्लूटोनियम उपउत्पादन निर्माण करतात त्यामुळे अण्वस्त्र प्रसाराच्या दृष्टीने ते संवेदनशील मानले जातात.
advertisement

या हल्ल्यानंतर इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने अमेरिकन आणि इस्रायली उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामाची ठिकाणे सोडण्याचे आवाहन केले आहे. Al Jazeera ने इराणी वृत्तसंस्था तस्नीमच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
IRGC ने इशारा दिला आहे की त्यांच्या लढवय्यांनी या भागातील अमेरिकन सहभाग असलेल्या औद्योगिक कंपन्यांवर तसेच इस्रायलशी संबंधित उद्योगांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथून बाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच हल्ले पूर्ण होईपर्यंत त्या परिसराच्या एक किलोमीटरच्या परिघातील रहिवाशांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 11:49 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
जगाचा श्वास रोखला, इराणच्या 'हेवी-वॉटर' रिॲक्टरवर बॉम्ब टाकला; रेडिएशनचा धोका? परिसर रिकामा करण्याचे आदेश










