Mumbai Indians : आयपीएलला काही तास उरले असताना मुंबईच्या संघात तिघांची एन्ट्री, कोण आहेत हे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स वानखेडेच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघात तिघांची एन्ट्री झाली आहे.
Mumbai Indians : आयपीएल 2026 च्या हंगामाला उद्या 28 मार्चपासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चँलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे.या सामन्यानंतर रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स वानखेडेच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघात तिघांची एन्ट्री झाली आहे. आता तीन खेळाडू कोण आहेत? आणि या खेळाडूंची मुंबई इंडियन्स संघात भूमिका काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर मुंबई इंडियन्स रविवारी वानखेडेच्या मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध सामन्यातून आपल्या मोहिमेला सूरूवात करणार आहे. या सामन्याला जवळपास अजून 48 तासाचा कालावधी शिल्लक आहे.त्या दरम्यान मुंबई संघात काही घडामोडी घडल्या आहेत. खरं तर मुंबईचा मेन बॉलर जसप्रीत बुमराहा सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये गेल्याने सर्वाची धाकधूक वाढली होती. कारण अनेकांना वाटलं त्याला दुखापत झाली आहे की काय, पण तस काहीच नव्हतं. उलट त्याला वर्कलोड मॅनेजमेंट आणि स्टेंथ अंँड कडिशनसाठीतो तिकडे गेला होता.पण तो अद्याप परतल्याची माहिती नाही आहे. पण तो उद्या पर्यंत मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे.त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
आता त्यात मुंबईत इंडियन्समध्ये आणखी तिघांची एंन्ट्री झाली आहे. आकाश मढवाल, रुशील उगरकर आणि सनी पटेल या तीन खेळाडूंची मुंबईत एंन्ट्री झाली आहे. हे खेळाडू मुंबईच्या टीमसोबत थेट सामन्यामध्ये दिसणार नाही आहेत. कारण हे खेळाडू मुंबईचे नेट बॉलर म्हणून संघात सामील झाले आहेत.त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांना हे प्रॅक्टीस देणार आहेत.
आकाश मढवालचा व्हिडिओ व्हायरल
advertisement
रोहित शर्माचा वानखेडेच्या मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मैदानावर पाऊल ठेवतो. मैदानावर पाऊल ठेवताच रोहित शर्माला पाहून मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू त्याला पाहून हात जोडतो, नंतर पुढे तो पाया पडण्याचा प्रयत्न करतो.इतक्यात रोहित शर्माच त्याच्या खांद्यावर हात टाकतो आणि चालू लागतो.
आता या घटनेत एक ज्यूनिअर खेळाडू रोहित शर्माला इतका आदर देतो ते पाहून त्याची लांबूनच चर्चा केली असती. पण मुंबईच्या राजा रोहित शर्मा जरा वेगळा आहे,कारण त्याने थेट खेळाडूच्या खांदयावरच हात ठेवला आहे आणि त्याला समजवत समजवत तो निघून गेला आहे.त्यामुळे रोहित शर्माचा हाच दिलदारपणा सगळ्यांना आवडला आहे.दरम्यान हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून आकाश मढवाल होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 11:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : आयपीएलला काही तास उरले असताना मुंबईच्या संघात तिघांची एन्ट्री, कोण आहेत हे खेळाडू?








