TRENDING:

विदर्भातील या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास, योगी आदित्यनाथांशी आहे खास कनेक्शन

Last Updated:

वर्धातील शास्त्री चौकात असलेल्या दुर्गादेवी मंदिराचं थेट उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी कनेक्शन आहे.. विश्व हिंदू महासंघ च्या अंतर्गत या मंदिराचा कारभार बघितला जातो

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 4 ऑक्टोबर: येत्या काही दिवसांत देशात नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. देशात देवीची अनेक मंदिरे आहेत. यापैकीच दुर्गामातेचं एक प्रसिद्ध मंदिर विदर्भातील वर्धा या ठिकाणी आहे. शास्त्री चौकात असणाऱ्या या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे या दुर्गामाता मंदिराचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखनाथ पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांच्याशी खास कनेक्शन आहे. याबाबत मंदिराचे विश्वस्त महंत मुकेशनाथ महाराज यांनी माहिती दिली आहे.
advertisement

दुर्गामाता मंदिराचं नेपाळ कनेक्शन

वर्ध्यातील दुर्गामाता मंदिर हे विश्व हिंदू महासंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अंतर्गत येतं. या संघटनेचं मुख्यालय नेपाळमध्ये आहे. या संघटनेच्या अंतर्गतच अखिल भारतीय योगी महासभा येते. त्यामुळे दुर्गामाता मंदिर हे योगी महासभेशीही जोडलेलं आहे. योगी महासभा हा एक योगिंचा समुह आहे. ज्याचे दिग्विजय महाराज प्रमुख होते. त्यानंतर अवैद्यनाथ महाराज आणि सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख आहेत, असं महंत मुकेशनाथ महाराज सांगतात.

advertisement

प्रभू रामाच्या गुरुंनी बांधलं हे मंदिर, गणेश कुंडाला आहे पौराणिक संदर्भ

योगी आदित्यनाथांशी खास संबंध

वर्ध्यातील शास्त्री चौकात असणाऱ्या दुर्गामाता मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. योगी महासभेशी संलग्न असणाऱ्या या मंदिराचं मुख्यालय हरिद्वार येथे आहे. तर मंदिरांची कार्यकारणी गोरखपुर आणि हरिद्वार येथून संचलित होते. गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश्वर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. त्यामुळे दुर्गामाता मंदिराचं योगी आदित्यनाथ यांच्याशी खास कनेक्शन आहे.

advertisement

महाराष्ट्रात 500 मंदिरे

विश्व हिंदू महासंघ या संस्थेची भारतभरात अनेक मठ आणि मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचं प्रसिद्ध गोरखनाथ मंदिरही याच संस्थेच्या अतंर्गत येतं. महाराष्ट्रात अंदाजे पाचशे मंदिरे महासंघाशी संलग्न आहेत. यातील वीस ते पंचवीस मंदिरे विदर्भामध्ये आहेत आणि दहा-बारा मंदिरांचे विश्वस्त मुकेशनाथ महाराज आहेत, असं महाराज सांगतात.

नवरात्रीत अनवाणी पायाने का चालतात? जाणून घ्या काय आहे कारण?

advertisement

नवरात्रीच्या दिवसात प्रचंड गर्दी

वर्धा येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव असतो. या काळात भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होते. हजारो अखंड ज्योती आणि घट यामुळे मंदिराची विशेष ओळखही आहे. मंदिरात संकट मोचक हनुमान, दुर्गादेवी, राधाकृष्ण, बारा ज्योतिर्लिंग, राम लक्ष्मण सीता, यासारख्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली असून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
विदर्भातील या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास, योगी आदित्यनाथांशी आहे खास कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल