प्रयागराजचे ज्योतिषी अमितराज वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्यावरील राहूची छाया तेव्हा अशुभ होते, जेव्हा कुटुंबप्रमख किंवा कुटुंबातील अनेक सदस्यांच्या कुंडलीत राहूची स्थिती अयोग्य असते. आपल्या घरात वर दिलेल्या कोणत्याही घटना घडताना दिसल्यास त्वरित जाणकारांची भेट घेऊन त्यांना आपली कुंडली दाखवावी आणि उपाययोजना कराव्या, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
चक्क सोन्या-चांदीच्या मोदकाचा बाप्पाला नैवेद्य!
advertisement
दरम्यान, घरावर राहूची अशुभ छाया आहे, याबाबत अनेक नकारात्मक संकेत दिसतात, ज्यांचा पुढे गंभीर परिणाम होऊ शकतो. यात घरातील व्यक्तीचं आजारपण आणि मृत्यूचाही समावेश असू शकतो. त्यामुळे साध्या साध्या वाटणाऱ्या या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, त्यांवर त्वरित उपाय करा.
शारदीय नवरात्रौत्सव केव्हापासून होतोय सुरू? यंदा काय असेल देवीचं वाहन?
'या' 5 संकेतांवरून ओळखा राहूचा प्रभाव
1. घरात सतत लाल मुंग्या दिसणं
घराच्या कोणत्याही कोपऱ्यात थोड्याथोडक्या मुंग्या दिसणं सामान्य आहे. मात्र जमिनीवर मोठ्या प्रमाणात, भिंतींवर मोठ्या प्रमाणात, बिछान्यात, कपाटात, कपड्यात, पाण्यात लाल मुंग्या दिसू लागल्या की, समजून जावं आपल्या घरावर राहूची अशुभ छाया आहे.
2. सतत इलेक्ट्रॉनिक सामान बिघडणं
तुम्ही घरात एखादी नवी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणली आणि ती काही दिवसांत किंवा महिन्यांमध्ये बिघडली आणि असं वारंवार होऊ लागलं की, काहीतरी गंभीर आहे हे आपण ओळखावं.
3. अति झोप येणं, सतत आळस जाणवणं
राहूच्या अशुभ छायेमुळे आळस प्रचंड वाढतो. ज्या व्यक्तीवर राहूचा अशुभ प्रभाव पडलाय ती व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहते. लहान मुलांमध्येसुद्धा ही लक्षणं दिसून येतात. अर्थातच सकाळी लवकर न उठल्यास दिवसभर शरिरात ऊर्जा जाणवत नाही. महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्य रात्री उशिरापर्यंत जेवतच राहतात.
4. घरात साप आढळणं, घराभोवती जंगली कबुतरांचा वावर
ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला सापदेखील म्हटलं जातं. शिवाय कबुतराला अशुभ मानलं जातं. त्यामुळे ज्या घरात साप आणि कबुतर आढळतात तिथे लक्ष्मी टिकत नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात साप आणि कबुतर आढळतात कारण त्यांना याठिकाणी राहूची अशुभ छाया असल्याचे संकेत आधीच मिळालेले असतात.
5. अडगळीच्या सामानात वाढ
राहूची अशुभ छाया असलेल्या घरातील अडगळीच्या सामानात झपाट्याने वाढ होते. कारण घरातल्या वस्तू एकामागून एक बिघडत जातात. शिवाय कुटुंबातील व्यक्तींमध्ये आळस वाढल्याने या वस्तू बाहेर काढण्याची किंवा विकण्याची ताकदही त्यांच्यात नसते. त्यामुळे या सर्व वस्तू घरातच पडून राहतात.
यावर उपाय काय?
1. कोणत्याही परिस्थितीत सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. दररोज सूर्याचं स्वागत प्रसन्न वातावरणात आनंदाने करावं. त्यानंतर हवंतर आपण झोपू शकता. असं केल्यास घरातील आळस पूर्णपणे नष्ट होईल.
2. घरातील बिघडलेलं सामान वेळच्या वेळी बाहेर काढावं, ते अजिबात एकत्र साचू देऊ नये. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा पूर्ण घराची साफसफाई करावी आणि सर्व वस्तू योग्य स्थितीत आहेत का, याची खात्री करून घ्यावी.
3. घरात कुठेही लाल मुंग्या दिसल्यास त्यांना मारू नये, तर योग्य उपाय करून त्यांना घरात येण्यापासून रोखावं.
4. स्वयंपाकघरात जेवणावर तुळशीपत्र ठेवावं. जमल्यास घरात सकाळी-संध्याकाळी भजन करावं.
5. घराच्या ज्या ज्या कोपऱ्यात शक्य असेल तिथे मोरपीस लावावं. यामुळे साप येणार नाही आणि राहूचा प्रभावही कमी होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)