TRENDING:

घरात पालीचं पडणं शुभ की अशुभ? मिळतो मोठा संकेत; शकुन शास्त्र काय सांगतं?

Last Updated:

आपल्या घरात नेहमी दिसणारी पाल काही वेळा अंगावर पडते. शकुनशास्त्रानुसार यालाही विशिष्ट संकेत दिले गेले आहेत. डाव्या बाजूला पाल पडल्यास शत्रूंवर विजय मिळतो, भुवईवर पडल्यास...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपल्या घरात पाली अनेकदा दिसतात, कधी भिंतीवर तर कधी कोपऱ्यात लपलेल्या. बहुतांश घरांमध्ये पाल असतेच. तिची ठेवणच अशी आहे की तिला पाहिल्यावर अनेकांना भीती वाटते. अनेकदा असं होतं की, घरात बसून गप्पा मारत असताना अचानक एखादी पाल अंगावर पडते. असं अनेकदा घडताना दिसतं.
Lizard fall meaning
Lizard fall meaning
advertisement

पाल अंगावर पडल्यावर लगेच आंघोळ केली जाते, ज्यामुळे तिचा वाईट परिणाम कमी होतो असं मानलं जातं. पण शकुन शास्त्रानुसार, पाल अंगावर पडणं शुभ मानलं जातं की अशुभ? शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडल्यास काय संकेत मिळतो? हेच आपण आज या बातमीत सविस्तर जाणून घेणार आहोत...

या ठिकाणी पाल पडली तर...

शकुन शास्त्रानुसार, अनेक पक्षी आणि प्राणी शुभ-अशुभ संकेतांशी संबंधित असतात. त्यापैकीच एक म्हणजे पाल. अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, लोकांच्या घरात भिंतींवर पाल चिकटलेल्या दिसतात. बहुतेक घरांमध्ये पाल असतेच. कधीकधी पाल अंगावरही पडते. शकुन शास्त्रानुसार, जर पाल शरीराच्या डाव्या बाजूला पडली तर ते शुभ मानले जाते. शत्रूंवर विजय मिळतो असं म्हटलं जातं. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीच्या भुवईवर पाल पडली तर ते आर्थिक नुकसान होण्याचे संकेत देते. दुसरीकडे, जर पाल एखाद्या व्यक्तीच्या गळ्यावर पडली, तर याचा अर्थ त्या व्यक्तीचा मान-सन्मान वाढणार आहे.

advertisement

लवकरच चांगली बातमी मिळते

घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला पाल दिसली, तर लवकरच कोणतीतरी मोठी आणि चांगली बातमी मिळेल, असं मानलं जातं. शकुन शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या बेंबी आणि गुडघ्यांवर पाल पडली तर ते शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे म्हटले जाते.

हे ही वाचा : ज्येष्ठ अमावस्येला दारात आलेला कावळा 'या' गोष्टींचे स्पष्ट संकेत देऊन जातो

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

हे ही वाचा : Black Lizard: घरात काळी पाल दिसत असल्यास सावध रहा! घडू शकणाऱ्या या 7 अशुभ गोष्टींचा संकेत

मराठी बातम्या/अध्यात्म/
घरात पालीचं पडणं शुभ की अशुभ? मिळतो मोठा संकेत; शकुन शास्त्र काय सांगतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल