TRENDING:

नव्या नवरीने सासरी पहिली होळी साजरी कारण का मानलं जात अशुभ? परंपरेमागे दडलंय मोठं कारण!

Last Updated:

भारतीय संस्कृतीत लग्नानंतर येणारा प्रत्येक सण नवविवाहित जोडप्यासाठी खास असतो. मात्र, होळीच्या बाबतीत एक अतिशय जुनी आणि विचित्र वाटणारी परंपरा आजही पाळली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
Holi 2026 : भारतीय संस्कृतीत लग्नानंतर येणारा प्रत्येक सण नवविवाहित जोडप्यासाठी खास असतो. मात्र, होळीच्या बाबतीत एक अतिशय जुनी आणि विचित्र वाटणारी परंपरा आजही पाळली जाते. अनेक समाजांत अशी प्रथा आहे की, नव्या नवरीने लग्नानंतरची पहिली होळी पतीच्या घरी साजरी करू नये. लग्नानंतरच्या पहिल्या होळीला नवरीने आपल्या माहेरी जाणे अनिवार्य मानले जाते. यंदा 24 फेब्रुवारी 2026 पासून होलाष्टक सुरू झाले असून, 2 मार्चला होळी आहे. अशा वेळी अनेक नवविवाहित तरुणी आपल्या पहिल्या होळीसाठी माहेरी जाण्याच्या तयारीत आहेत. पण ही परंपरा का पाळली जाते? यामागे कोणती धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत? जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

पहिली होळी माहेरी साजरी करण्यामागची मुख्य कारणे

सासू आणि सुनेने एकत्र होळी पाहणे अशुभ

या परंपरेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे सासू आणि सुनेचा संबंध. जुन्या मान्यतेनुसार, लग्नानंतर सासू आणि सुनेने एकत्र 'होलिका दहन' म्हणजेच होळीची पूजा आणि जळणारी होळी पाहू नये. असे मानले जाते की, सासू-सुनेने एकाच वेळी पेटलेली होळी पाहिली तर त्यांच्यातील नातेसंबंधात कटुता येते आणि त्यांच्यात सतत भांडणे होऊ शकतात. घराच्या सुख-शांतीसाठी या काळात सुनेला माहेरी पाठवले जाते.

advertisement

'पहिली होळी' आणि नवीन जीवनाची सुरुवात

होळी हा सण जुन्या वाईट गोष्टी जाळून नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचे प्रतीक आहे. नवविवाहितेने आपल्या आयुष्यातील हा संक्रमणाचा काळ आपल्या जन्मदात्यांसोबत घालवावा, अशी जुनी धारणा आहे. यामुळे तिला माहेरच्या आठवणी ताज्या करण्याची आणि सासरच्या नवीन जबाबदाऱ्यांपासून थोडा काळ विश्रांती घेण्याची संधी मिळते.

संतती प्राप्ती आणि आरोग्य

advertisement

काही प्रादेशिक श्रद्धांनुसार, जर नवविवाहित जोडप्याने लग्नानंतरची पहिली होळी एकत्र पाहिली, तर त्यांच्या होणाऱ्या अपत्यावर किंवा त्यांच्या वैवाहिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 'होलाष्टक' सुरू होताच सुनेला सन्मानाने माहेरी पाठवण्याची प्रथा पडली आहे.

धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय पैलू

ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या आधीचे 8 दिवस हे ग्रहांच्या उग्र स्थितीचे काळ असतात. या काळात ग्रहांचे नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी शुभ कार्ये वर्ज्य असतात. नवविवाहित स्त्री ही घराची 'लक्ष्मी' मानली जाते. तिचे नवीन घरात स्थिर होणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. या काळात तिने माहेरी राहून आपल्या कुळाच्या आणि वडिलांच्या आशीर्वादाने सकारात्मक ऊर्जा मिळवावी, असा यामागील आध्यात्मिक उद्देश असतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
नव्या नवरीने सासरी पहिली होळी साजरी कारण का मानलं जात अशुभ? परंपरेमागे दडलंय मोठं कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल