TRENDING:

Abhishek Sharma : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी अभिषेक शर्माने दिली हेल्थ अपडेट, अर्शदीप सिंगच्या Reel मध्ये पहिल्यांदाच बोलला!

Last Updated:

Abhishek Sharma Health Update by Arshdeep Singh : सध्या अभिषेक पूर्णपणे फिट नसला तरी, त्याने अर्शदीपसोबतच्या व्हिडिओमध्ये आपल्या तब्येतीबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले असून चाहत्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Abhishek Sharma Fitness Updates : टीम इंडियाचा स्फोटस सलामीवीर बॅटर अभिषेक शर्मा पोटाच्या विकारातून सावरल्यानंतर पहिल्यांदाच टीममधील सहकारी अर्शदीप सिंगच्या व्लॉगमध्ये दिसला. गेल्या मॅचमध्ये त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील नामिबियाविरुद्धच्या मॅचमध्ये पोटाच्या त्रासामुळे त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर बसावं लागलं. सध्या तो पूर्णपणे फिट नसला तरी, त्याने अर्शदीपसोबतच्या व्हिडिओमध्ये आपल्या तब्येतीबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले असून चाहत्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
Abhishek Sharma Health Update by Arshdeep Singh
Abhishek Sharma Health Update by Arshdeep Singh
advertisement

हाऊ आर यू?

अर्शदीपने त्याच्या रीलमध्ये अभिषेकला प्रश्न केले. हाऊ आर यू? (तू कसा आहेस) असा सवाल अर्शदीपने अभिषेक शर्माला केला. त्यावर 'डाल राईस गुड' (डाळ भात चांगला आहे) असं उत्तर अभिषेकने दिलं. त्यावर अर्शदीपने पुन्हा आर यू गुड? (तुला बरं वाटतंय का) असा प्रश्न विचारला. त्यावर डाल राईस वेरी गुड, मी गूड (डाळ भात खूप चांगला आहे आणि मी ठीक आहे), असं उत्तर अभिषेक शर्माने दिलं. आर यू स्लीम (तुझं वजन कमी झालंय का), असं विचारल्यावर फ्यू केजी कम (काही किलो वजन कमी झालंय), असं उत्तर अभिषेक शर्मा उत्तर देताना दिसतोय.

advertisement

पाहा Video

2 किलो वजन कमी झाल्याची माहिती

अर्शदीप सिंगने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये अभिषेकला त्याच्या आरोग्याबद्दल आणि डायटबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. विशेषतः 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज मॅचपूर्वी तो मैदानात परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिषेकने सांगितले की, सध्या तो खूप कडक डाएट फॉलो करत असून जेवणात फक्त डाळ-भात खात आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आपले 2 किलो वजन कमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

advertisement

पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही?

'एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस' आणि 'डिहायड्रेशन'चा त्रास झाल्यामुळे नवी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. इन्फेक्शन गंभीर असल्याने त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम झाला आहे. आता त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी, पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यासाठी त्याला अजून काही काळ लागू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये अभिषेक खेळणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

advertisement

घाई करण्याच्या विचारात नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, शुक्रवारी त्याने मैदानावर हलकी प्रॅक्टिस केली असली तरी, टीम मॅनेजमेंट त्याच्या बाबतीत कोणतीही घाई करण्याच्या विचारात नाही. अभिषेकसारख्या स्फोटक बॅटरची टीमला गरज आहे, पण त्याच्या फिटनेसशी तडजोड केली जाणार नाही, असे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. त्यामुळे संजू सॅमसनला पाकिस्तानविरुद्ध पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी अभिषेक शर्माने दिली हेल्थ अपडेट, अर्शदीप सिंगच्या Reel मध्ये पहिल्यांदाच बोलला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल