TRENDING:

Arjun Tendulkar : 'मला बेंचवर बसायचं नाहीये' म्हणणाऱ्या अर्जुन तेंडूलकरला संधी मिळणार? ऋषभ पंतचा 'प्लॅन बी' रेड्डी!

Last Updated:

Arjun Tendulkar, SRH vs LSG : टीममध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता असून अर्जुन तेंडुलकरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करून गोलंदाजी अधिक मजबूत करण्याचा विचार सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Arjun Tendulkar In SRH vs LSG : यंदाच्या आयपीएल हंगामातील 10 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जाएन्ट्स यांच्यात खेळवला जाणार आहे. रविवारी होणाऱ्या डबल हेडर मॅचपूर्वी लखनऊचा नवा कॅप्टन ऋषभ पंत याने आपल्या रणनीतीत मोठे बदल करण्याचे संकेत दिले असून, सर्वांचे लक्ष अर्जुन तेंडुलकरकडे लागलं आहे. मुंबई इंडियन्सची साथ सोडून लखनऊमध्ये सामील झालेला अर्जुन सध्या बेंचवर असून, त्याला आजच्या मॅचमध्ये संधी मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.
Arjun Tendulkar In SRH vs LSG
Arjun Tendulkar In SRH vs LSG
advertisement

अर्जुन तेंडुलकरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश?

लखनऊ सुपर जायंट्सने या सीझनची सुरुवात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवाने केली. या पहिल्याच मॅचमध्ये लखनऊची बॅटिंग पूर्णपणे कोलमडली होती, ज्यामुळे टीमच्या कॉम्बिनेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. ऋषभ पंतने या पराभवातून बोध घेत आता 'प्लॅन बी' तयार केला आहे. या प्लॅननुसार, टीममध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता असून अर्जुन तेंडुलकरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करून बॉलिंग अधिक मजबूत करण्याचा विचार सुरू आहे.

advertisement

अर्जुनचा अचूक योर्कर अन् स्टंप्स उडवले

अर्जुन तेंडुलकर सध्या नेट प्रॅक्टिसमध्ये जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. लखनऊ सुपर जायंट्सने शेअर केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुन अचूक योर्कर टाकून स्टम्प्स उडवताना दिसला. त्याच्या या धारदार बॉलिंगमुळे फॅन्सकडून त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचा पाणी घेऊन जातानाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर एक ऑलराऊंडर म्हणून अर्जुन तेंडूलकर घातक ठरू शकतो.

advertisement

जर अर्जुनला संधी मिळाली, तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, हैदराबाद विरुद्धच्या या मॅचमध्ये टॉस खूप महत्त्वाचा ठरेल. दुपारची मॅच असल्याने दवाचा (Dew) प्रभाव नसेल, पण उष्णतेचा विचार करता कॅप्टन मोठी रिस्क घेण्याच्या तयारीत आहे. जर अर्जुनला संधी मिळाली, तर तो ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सारख्या आक्रमक ओपनर्सना रोखण्याचे आव्हान कसे पेलतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 'मला बेंचवर बसायचं नाहीये' म्हणणाऱ्या अर्जुन तेंडूलकरला संधी मिळणार? ऋषभ पंतचा 'प्लॅन बी' रेड्डी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल