ऑनलाइन गेमिंगवर बंदी
आशिया कपपूर्वी, भारत सरकारने एक नवीन कायदा केला आहे ज्यामध्ये त्यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. यानंतर, बीसीसीआयचा ड्रीम 11 सोबतचा करार मोडला गेला. ड्रीम 11 पूर्वी भारतीय संघाच्या जर्सीचे स्पॉन्सर होते. पण आता भारतीय बोर्डाने त्याच्याशी संबंध तोडले असल्याने टीम इंडियाला मुख्य स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरावं लागेल. तब्बल 23 वर्षानंतर टीम इंडियावर अशी परिस्थिती आली आहे.
advertisement
कशी आहे जर्सी?
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू शिवम दुबे याने आशिया कपसाठी बीसीसीआयने जारी केलेली नवीन जर्सी घालून फोटोशूट केलं आहे. दुबेने सोशल मीडियावर नवीन जर्सीमधील तीन फोटो पोस्ट केले आहेत. आशिया कपमध्ये भारतीय खेळाडू ज्या जर्सी घालतील त्यावर मोठ्या अक्षरात 'INDIA' लिहिलेले आहे. जर्सीच्या डाव्या बाजूला BCCI चा लोगो आणि उजव्या बाजूला आशिया कप 2025 चा लोगो आहे.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा स्कॉड
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग.