सुरूवातीच्या 4 विकेट लवकर गेल्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेली तेजल हसबनीस आणि राधा यादव यांनी इंडिया ए चा डाव सावरला. तेजलने 34 बॉलमध्ये नाबाद 51 रनची खेळी केली, ज्यात तिने 3 फोर आणि एक सिक्स मारली. याशिवाय कर्णधार राधा यादवने 30 बॉलमध्ये 3 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 36 रन केले. तेजल आणि राधाच्या या पार्टनरशीपमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 रन केल्या.
advertisement
भारताने दिलेल्या 135 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या महिला टीमचा 19.1 ओव्हरमध्ये फक्त 88 रनवर ऑलआऊट झाला. भारताकडून प्रेमा रावतने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सोनिया मेंढीया आणि तनुजा कनवरला 2-2 विकेट मिळाल्या. सैमा ठाकोर, मिन्नू मनी आणि राधा यादवला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
कोण आहे तेजल हसबनीस?
तेजल हसबनीसचा जन्म 16 ऑगस्ट 1997 ला पुण्यामध्ये झाला. तेजल महाराष्ट्र आणि वेस्ट झोनकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. सांगलीच्या स्मृती मानधनानंतर आता पुण्याची तेजल हसबनीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तेजलला टीम इंडियातही संधी मिळाली. ऑक्टोबर 2024 मध्ये तेजलने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तेजलने तिची पहिली वनडे मॅच खेळली.
तेजलने भारताकडून आतापर्यंत 6 वनडेमध्ये 46.66 च्या सरासरीने 140 रन केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
