बीसीसीआयसमोर मोठा पेच
भारतीय संघाला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन वनडे मॅच खेळायचे आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलिया 'ए' संघ भारत 'ए' संघाविरुद्ध कानपूरमध्ये तीन अनाधिकृत वनडे मॅच खेळणार आहे. त्याआधी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी नुकतीच विराट कोहलीशी त्याच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल चर्चा केली. मात्र, विराट कोहलीने बीसीसीआयला स्पष्ट काहीही सांगितलं नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
advertisement
कोहलीच्या बाजूने योग्य प्रतिसाद नाही
'रेवस्पोर्ट्स'च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. मात्र, रिपोर्टनुसार कोहलीच्या बाजूने योग्य प्रतिसाद न मिळाल्याने निराशा आहे. टीम मॅनेजमेंटला असं वाटत होतं की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजआधी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारत 'ए' संघासोबत काही मॅच खेळाव्यात. मात्र, दोन्ही स्टार मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जातोय.
विराट भारत 'ए' संघासाठी खेळणार?
दरम्यान, रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने बेंगळुरू येथील बोर्डच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये रोहितचा केएल राहुलसोबत सराव करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, तोही भारत 'ए' संघाचा भाग नाही. दुसरीकडे, विराट कोहली अजूनही लंडनमध्ये आहे. विराटने काही दिवसांपूर्वी सराव केला होता आणि त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आले होते. अशातच आता किंग कोहली कोणता निर्णय घेणार? असा सवाल विचारला जात आहे.