वाराणसी, 16 ऑक्टोबर : आयसीसी विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 2011 मध्ये भारताने हा विश्वचषक जिंकला होता. आता पुन्हा एकदा मायभूमीत भारतीय संघ हा विश्वचषक आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरत आहे. आतापर्यंत भारताने सतत तीन सामने जिंकत हॅटट्रिक केली आहे. पाकिस्तानवरील विजयानंतर संपूर्ण देशात क्रिकेटरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळेच वाराणसीच्या एका प्रसिद्ध लस्सीवाल्याने भारतीय संघाच्या हॅटट्रिकनंतर एक मोठी घोषणा करुन टाकली.
advertisement
देशासह जगभरामध्ये वाराणसीची पहलवान लस्सी आपल्या दर्जेदार चवीसाठी प्रसिद्ध आहे. या पहलवान लस्सीच्या संचालकाने सांगितले की, भारताने विश्वचषक जिंकल्यावर फ्रीमध्ये लस्सीची ऑफर दिली आहे. दुकानदार मनोज यादव म्हणाले की, जर भारतीय संघ विश्वचषकातील अंतिम सामन्यात जिंकली तर ते आनंदाने संपूर्ण दिवसभर लोकांना फ्रीमध्ये लस्सी पाजतील.
2011 मध्येही पाजली होती लस्सी -
2011 च्या विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामना जिंकत तब्बल 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. यामुळे संपूर्ण देशात एक आनंदाचे वातावरण होते. मनोज यादव यांनी सांगितले की, त्यावेळी सुद्धा पहलवान लस्सी वाले आनंदाने फ्रीमध्ये लस्सी पाजत होते. या दुकानाला 90 वर्षांचा वारसा आहे. आपल्या चवीमुळे पहलवान लस्सी ही देशात प्रसिद्ध आहे.
नेता ते अभिनेता सर्वच आहेत फॅन -
देशातील अभिनेते ते मोठमोठे राजकारणी नेते येथील पहलवान लस्सीचे रसिक आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, धमेंद्र प्रधान, अरुण जेटली, उपमुख्यमंत्री केशव मौर्या, बृजेश पाठक सह अनेक नेत्यांनी येथील लस्सीचा स्वाद घेतला आहे. इतकेच नव्हे तर बॉलिवुडचे सुपरस्टार अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, राजेश खन्ना, संजय मिश्रा, शंकर महादेवन सह अनेक प्रसिद्ध स्टार पहलवान लस्सीचे रसिक आहेत.