TRENDING:

D Gukesh Net Worth: वय वर्ष 18... 17 दिवसांत 11 कोटी कमावले, चेस चॅम्पियन गुकेशची डोळ्यात भरणारं नेटवर्थ, आकडा किती?

Last Updated:

D Gukesh Net Worth: यावर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणाऱ्या गुकेशची एकूण संपत्ती जागतिक चॅम्पियनशिपपूर्वी 8.26 कोटी रुपये होती

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विश्वनाथन आनंदनंतर भारताला बुद्धिबळात दुसरा विश्वविजेता मिळाला. बुद्धिबळाच्या 138 वर्षांच्या इतिहासात डी गुकेश हा विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. चीनच्या दिग्गज डिंग लिरेनविरुद्ध 14 वा सामना जिंकून इतिहास रचणाऱ्या गुकेशला वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यवधी रुपये बक्षीस मिळाले.
News18
News18
advertisement

यावर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणाऱ्या गुकेशची एकूण संपत्ती जागतिक चॅम्पियनशिपपूर्वी 8.26 कोटी रुपये होती, मात्र विश्वविजेता बनल्यानंतर त्याच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. त्याने 17 दिवसांत 11 कोटींहून अधिक कमाई केली. सिंगापूर येथे 17 दिवस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पार पडली.

डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 14 व्या आणि अंतिम सामन्यात चीनच्या दिग्गज डिंग लिरेनचा पराभव केला. गुकेशने हा सामना 7.5-6.5 असा जिंकून इतिहास रचला. शेवटच्या डावात गुकेशकडे काळ्या रंगाचे मोहरे (काळ्या सोंगट्या) होत्या.

advertisement

विजयानंतर गुकेश भावूक झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने डाव संपल्यानंतर पुन्हा बुद्धिबळाचा पट जसा मांडतो तसा मांडला आणि त्याला नमस्कार केला. गुकेश 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदच्या अकादमीत बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेत आहे. विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशने 11.45 कोटी रुपये बक्षीस मिळाले.

डिंग लिरेनला 9.75 कोटी रुपये मिळाले. FIDE च्या नियमांनुसार, अंतिम खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपये मिळतात, तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये विभागली जाते. गुकेशने तीन सामने जिंकले. त्याने तिसरा, 11वा आणि 14वा गेम जिंकला. ज्यातून त्याला 5.07 कोटी मिळाले, तर गुकेशला एकूण 11.45 कोटी मिळाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापूर्वी गुकेशची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती, जी आता 20 कोटींच्या पुढे गेली आहे. बुद्धिबळातील बक्षिसांची रक्कम आणि जाहिराती हे गुकेशचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. या वर्षी त्याने 3 मोठी जेतेपदे पटकावली. गुकेशने एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रता स्पर्धा आणि 'कॅन्डीडेट्स टूर्नामेंट'मध्ये भाग घेतला होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
D Gukesh Net Worth: वय वर्ष 18... 17 दिवसांत 11 कोटी कमावले, चेस चॅम्पियन गुकेशची डोळ्यात भरणारं नेटवर्थ, आकडा किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल