रोहितला बाहेर करतील
भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने ब्रॉन्को टेस्टच्या माध्यमातून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावरही टीका केली आहे. 2027 च्या वर्ल्ड कप प्लानिंगमधून विराटला बाहेर करणं खूप कठीण जाईल, पण मला शंका आहे की रोहित शर्माला टीममध्ये ठेवलं जाईल. मी भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ब्रॉन्को टेस्ट ही रोहित शर्मासारख्या खेळाडूंसाठी आणली गेली आहे, असा आरोप मनोज तिवारीने केला आहे.
advertisement
मनोज तिवारीने ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्याच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केलं आहे. गौतम गंभीर मागच्या वर्षी जुलै महिन्यात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला. तर आता एड्रियन ले रॉक्स टीम इंडियाचे स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच झाले आहेत. एड्रियन टीममध्ये आल्यानंतर त्यांनी ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्याचा आग्रह धरला.
विराट कोहलीला त्याच्या उत्कृष्ट फिटनेसमुळे प्रश्न विचारला जाणार नाही, पण रोहित ब्रॉन्को टेस्टमध्ये टिकू शकेल का? मला वाटतं काही खेळाडूंना बाहेर करण्यासाठी ही टेस्ट आणली गेली आहे. गंभीर, सेहवाग, युवराज आणि इतर दिग्गज खेळाडू खूप चांगली कामगिरी करत होते, पण 2011 साली टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर यो-यो टेस्ट आणण्यात आली, आता ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्यात येणार आहे, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.