TRENDING:

4 ओव्हरमध्ये 8 विकेट अन् 7 रन... आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडला, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा बॉलर कोण?

Last Updated:

4 ओव्हरमध्ये 7 रन आणि 8 विकेट, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही बॉलरला एका सामन्यात 8 विकेट घेता आल्या नव्हत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 4 ओव्हरमध्ये 7 रन आणि 8 विकेट, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कधीच कोणत्याही बॉलरला एका सामन्यात 8 विकेट घेता आल्या नव्हत्या, पण आता हा विश्वविक्रम घडला आहे. भुतानचा डावखुरा स्पिनर सोनम येशे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा करून दाखवला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 विकेट घेणारा सोनम जगातला पहिला बॉलर बनला आहे.
4 ओव्हरमध्ये 8 विकेट अन् 7 रन... आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडला, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा बॉलर कोण?
4 ओव्हरमध्ये 8 विकेट अन् 7 रन... आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडला, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा बॉलर कोण?
advertisement

सोनम येशेने म्यानमारविरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 8 विकेट घेतल्या आहेत. सोनमच्या या कामगिरीमुळे भुतानने दिलेल्या 128 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना म्यानमारचा 45 रनवरच ऑलआऊट झाला. या सीरिजमध्ये सोनम येशेने 4 सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत.

येशेच्या आधी पुरुषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त 2 बॉलरना एका सामन्यात 7 विकेट घेता आल्या होत्या. स्याजरुल इद्रस (2023 साली चीनविरुद्ध मलेशिया सामन्यात 8 रन देऊन 7 विकेट) आणि अली दाऊद (2025 मध्ये भुतानविरुद्ध बहरीनकडून 19 रनवर 7 विकेट) यांच्या नावावर हा विक्रम होता. आंतरराष्ट्रीय सामन्याशिवायही असा कारनामा फक्त दोन वेळा झाला आहे. कॉलिन एकरमॅनने 2019 साली बर्मिंघम बियर्सविरुद्ध लीसेस्टरशायरसाठी 18 रन देऊन 7 विकेट आणि तस्कीन अहमदने 2025 साली ढाका कॅपिटल्सविरुद्ध दरबार राजशाहीकडून 19 रन देऊन 7 विकेट घेतल्या होत्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय?
सर्व पहा

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वोत्तम बॉलिंगचा विक्रम इंडोनेशियाच्या रोहमलियाने 2024 साली मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात केला होता. तिने शून्य रन देऊन 7 विकेट घेतल्या होत्या.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
4 ओव्हरमध्ये 8 विकेट अन् 7 रन... आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडला, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा बॉलर कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल