हा विजय आमच्यासाठी आश्चर्यकारक - बांग्लादेश कॅप्टन
आशिया कपच्या सुपर - 4 मध्ये झालेल्या रोमांचक टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. या पराभवानंतरही बांग्लादेशचा प्रभारी कर्णधार जकेर अलीने आपल्या टीमच्या खेळाडूंचे कौतुक केलं. तो म्हणाला की, हा विजय आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण आम्ही चांगली तयारी केली होती. हे संपूर्ण श्रेय खेळाडूंचं आहे. त्यांनी दहा ओव्हरनंतर परिस्थितीनुसार स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ऍडजेस्ट केलं, पण त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलर्सने सामना फिरवला, असं म्हणत जाकीर अलीने टीम इंडियाच्या बॉलर्सवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
advertisement
पाकिस्तानला जाकीर अलीचं चॅलेन्ज
जाकीर अली याने पुढं म्हटलं की, "आम्ही या मॅचमधून खूप काही शिकलो आहोत आणि उद्या आमची दुसरी मॅच आहे. आम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की आम्ही उद्याची मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश करू शकतो. आम्ही कोणत्या कॉम्बिनेशनसोबत मैदानात उतरणार, हे पाहावे लागेल, पण आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत जाकीर अलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी पाकड्यांना इशारा दिला आहे.
कशी झाली मॅच?
दरम्यान, या मॅचमध्ये भारतासाठी अभिषेक शर्माने पुन्हा एकदा शानदार बॅटिंग केली. त्याने आक्रमक खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण दुर्दैवाने तो रनआउट झाला. त्यामुळे, भारताची धावगती मंदावली आणि 200 च्या आसपास वाटणारा स्कोर 168 पर्यंतच पोहोचला. 169 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशकडून सैफ हसनने एकट्याने झुंज दिली. मात्र, बांगलादेशला सामना जिंकता आला नाही. भारतीय बॉलिंगने बांगलादेशच्या टीमवर दबाव वाढवला आणि त्यांना 41 रन्सने हरवलं.