...तर सर्व प्रेक्षकांसाठी डिनर होस्ट करेल
अहमद शहजादने बाबरच्या क्षमतेवर शंका उपस्थित करताना एक मोठी घोषणा केली. त्यानं म्हटलं की, जर बाबर आझमने रविवारी भारतासारख्या तगड्या टीमविरुद्ध मॅच विनिंग खेळी खेळली, तर तो शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी शानदार डिनर होस्ट करेल. बाबरने मोठ्या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना केवळ निराश केलं आहे, असा आरोपही त्याने यावेळी केला.
advertisement
...तर मी निवृत्ती मागे घेण्याचा विचार करेल
वेगवान बॉलर मोहम्मद आमिरने तर बाबरच्या खेळीवर स्वतःच्या करिअरची पैज लावली आहे. आमिरने म्हटले की, जर बाबर आझमने भारतासमोर 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फिफ्टी प्लस रन्सची मॅच विनिंग इनिंग खेळली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली निवृत्ती मागे घेण्याचा विचार करेल. आमिरने डिसेंबर 2024 मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटला रामराम ठोकला होता.
बाबरला टोला लगावला
या चर्चेत माजी यष्टीरक्षक राशीद लतीफने देखील उडी घेत बाबरला टोला लगावला. शहजाद आणि आमिरच्या पैजेवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, "बाबर आझम इतका वेळ बॅटिंगच करू शकत नाही, त्यामुळे या पैजेचा काही उपयोग नाही." बाबरच्या संथ फलंदाजीमुळे टीमवर दबाव येतो, असे मत त्याने अनेकदा व्यक्त केले आहे.
बाबर आझमची खिल्ली उडवली
दरम्यान, पाकिस्तानच्या या दिग्गजांनी ज्या पद्धतीने बाबर आझमची खिल्ली उडवली आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आता 15 फेब्रुवारीच्या मॅचमध्ये बाबर आपल्या बॅटने या टीकाकारांना चोख उत्तर देणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या वादाचा टीम पाकिस्तानच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
