TRENDING:

IND vs PAK : भारताला ट्रॉफी मिळालीच नाही, मोहसिन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन पळाले, मध्यरात्री 2: 30 ला हायव्होल्टेज ड्रामा! पाहा VIDEO

Last Updated:

IND vs PAK Mohsin Naqvi Viral Video : तब्बल 15 ते 20 मिनिटाच्या वादानंतर मोहसिन नक्वी यांना राग आला अन् मोहसिन नक्वी यानी आशिया कपची ट्रीफी उचलली अन् पळ काढल्याचं पहायला मिळालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mohsin Naqvi left the field with Asia Cup trophy : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला अन् ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पडलं. पाकिस्तानला सलग तिसऱ्यांना गुडघ्यावर आणल्यानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सूर्यकुमार यादवने पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.
IND vs PAK Mohsin Naqvi he left the field with Asia Cup trophy
IND vs PAK Mohsin Naqvi he left the field with Asia Cup trophy
advertisement

मोहसिन नक्वी यांना राग आला अन्...

सूर्याने आपला हट्ट कायम ठेवला अन् मोहसिन नक्वी ताटकळत उभे राहिले. तब्बल 15 ते 20 मिनिटाच्या वादानंतर मोहसिन नक्वी यांना राग आला अन् मोहसिन नक्वी यानी आशिया कपची ट्रीफी उचलली अन् पळ काढल्याचं पहायला मिळालं. मोहसिन नक्वी यांच्या हातून आम्हाला ट्रॉफी नको, त्यांनी स्टेजवरून खाली उतरावं, अशी मागणी टीम इंडियाने केली होती. त्यानंतर मोहसिन नक्वी यांना राग आला अन् त्यांनी टीम इंडियाला ट्रॉफी दिली नाही.

advertisement

पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं रात्री अडीच वाजता आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय सैन्य दलासाठी मोठी घोषणा केली. पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. या पूर्ण स्पर्धेमधील प्रत्येक सामन्याची माझी मॅचची फी सैन्य दलाला देणार आहे. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमारने सांगितले की, ही फक्त एक ट्रॉफी नाही, ही देशाच्या सन्मानाशी जोडलेली भावना आहे. आपले जवान सीमारेषेवर आपल्यासाठी लढतात, तर आम्ही मैदानावर लढतो. माझ्या दृष्टीने या विजयाचा खरा मान त्यांचाच आहे. सूर्यकुमारच्या या निर्णयाचं कौतुक सोशल मीडियावरुन जगभरातून केलं जातं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारताला ट्रॉफी मिळालीच नाही, मोहसिन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन पळाले, मध्यरात्री 2: 30 ला हायव्होल्टेज ड्रामा! पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल