TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तान सरकारची आडमुठी भूमिका, भारताविरुद्धची वर्ल्ड कपची मॅच रद्द? BCCI ने एका वाक्यात स्पष्टच सांगितलं!

Last Updated:

IND vs PAK T20 World Cup 2026 Update : पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप नक्कीच खेळेल पण भारताविरुद्ध आम्ही खेळणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मांडल्यानंतर आता बीसीसीआयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistan boycott Match Against India at T20 World Cup : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बिनकामाची चुळबूळ सुरू होती. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळल्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय नव्हता पण उगाच खोड्या काढून पाकिस्तानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ड्रामा सुरू केला. आधी बांगलादेशच्या मुद्द्यावरून खोड्या काढणाऱ्या पाकिस्तानने आता भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारला हांजी हांजी करणाऱ्या पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता राजकीय डावपेच सुरू केले आहेत. अशातच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप नक्कीच खेळेल पण भारताविरुद्ध आम्ही खेळणार नाही, अशी भूमिका पीसीबीने घेतली. त्यावर आता बीसीसीआयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
IND vs PAK Pakistan boycott Match Against India at T20 World Cup
IND vs PAK Pakistan boycott Match Against India at T20 World Cup
advertisement

आयसीसीने पाकिस्तानला धारेवर धरलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ट्विट करण्यात आल्यानंतर आयसीसीने पाकिस्तानला धारेवर धरलं. अद्याप PCB कडून याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, या निर्णयाचा सखोल विचार करण्याचे आवाहन पाकिस्तानला करण्यात आले आहे, असं आयसीसीने म्हटलं आहे. जर पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकला, तर त्याचे दूरगामी परिणाम केवळ त्या मॅचवरच नाही, तर संपूर्ण स्पर्धेच्या रचनेवर होऊ शकतात, असं म्हणत आयसीसीने पाकिस्तानला सुचक इशारा दिलाय. त्यानंतर आता बीसीसीआयने आपली भूमिका मांडली.

advertisement

advertisement

आयसीसीच्या पारड्यात चेंडू

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत साकरिया यांनी स्पष्ट केलं की, पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानने सामना बहिष्कृत केल्याबाबत बीसीसीआयला कोणतीही ऑफिशियल सूचना प्राप्त झालेली नाही. आम्ही अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा करत आहोत, असं म्हणत साकरिया (Devajit Saikia) यांनी एका वाक्यात पाकिस्तानला उत्तर दिलं. यावेळी बीसीसीआयने आयसीसीच्या पारड्यात चेंडू टाकला आहे.

advertisement

पाकिस्तान सरकारचं निवदेनात काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, पाकिस्तानच्या सरकारने सोशल मीडियावर एक निवेदन जाहीर केलं. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकार आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागाला मंजुरी देते, मात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संघ मैदानात उतरणार नाही, असं पाकिस्तानच्या सरकारने निवदेनात म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तान सरकारची आडमुठी भूमिका, भारताविरुद्धची वर्ल्ड कपची मॅच रद्द? BCCI ने एका वाक्यात स्पष्टच सांगितलं!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल