फायनलमध्ये पराभव केला आहे.भारताने दिलेल्या 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशचा डाव 88 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे भारताने हा सामना 46 धावांनी जिंकत फायनल जिंकली आहे. या
विजयासह भारताने बांग्लादेशकडून वर्ल्ड कप ड्राम्याचा सगळाच बदला घेतला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 134 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची सूरूवात खराब झाली होती. कारण बांग्लादेशची सलामीवीर इश्मा तांजिम 3 वर बाद झाली होती.तिच्यानंतर शकीमा सुलताना आणि सरमीन सुलताना यांनी बांग्लादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण शकीमा 20 तर सरमीन 18 धावावर बाद झाली. तिच्यानंतर सादीआ अक्तर 10 वर आऊट झाली. लोटल मंडर 1,फाहीमा खातून 14,फर्जना इस्मिन 6, संजिदा मेघला 5, फातेमा सोनिया 1 आणि सोफीया खातून 9 धावांवर बाद झाली होती. अशाप्रकारे 19.1 ओव्हरमध्ये बांग्लादेशचा डाव 88 वर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे भारताने 46 धावांनी ही फायनल जिंकली होती.
advertisement
यावेळी भारताकडून प्रेमा रावतने 3 विकेट,सोनिया मेंढीया, तनुजा कानवेर 2 विकेट, साईमा ठोकर,, मिनू मनी आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
खरं तर हा सामना एसीसी रायझिंग स्टार आशिया कपमध्ये खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने बांग्लादेशला फायनलला धुळ चारली आहे.
भारताच्या फलंदाजीबद्दल बोलायच झालं तर तेजल हसबनीसने 51 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. तिच्यासोबत कॅप्टन राधा यादवने 30 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 धावा केल्या होत्या. बांग्लादेशकडून कर्णधार फाहीमा खातूनने 4 विकेट घेतल्या होत्या. तिच्यासोबत फातिमा आणि फर्जानाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
