TRENDING:

IND vs ENG U19 World Cup Final : इंग्लंड 28 वर्षांचा दुष्काळ संपवणार? वैभव सूर्यवंशीविरुद्ध उतरवला 18 वर्षांचा घातक खेळाडू!

Last Updated:

IND U19 vs ENG U19 World Cup Final Playing XI : इंग्लंड संघाने एक मोठा बदल केला असून एलेक्स फ्रेंचच्या जागी एलेक्स ग्रीनला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या टीमला गेल्या 28 वर्षांपासून या जेतेपदाची प्रतीक्षा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India VS England U19 Playing XI : अंडर-19 वर्ल्ड कप 2026 चा हाय-व्होल्टेज फायनल मॅच शुक्रवारी (6 फेब्रुवारी) हरारे येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील दोन सर्वात बलाढ्य टीम्स, भारत आणि इंग्लंड, विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. विशेष म्हणजे, संपूर्ण टूर्नामेंटमध्ये या दोन्ही टीम्सनी एकही मॅच गमावलेली नाही. फायनलमध्ये दबावाचा सामना करत जो संघ सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल, तोच चॅम्पियन ठरेल. अशातच आता भारतीय टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
India VS England U19 World Cup Final Playing XI Alex Green Replace Alex French
India VS England U19 World Cup Final Playing XI Alex Green Replace Alex French
advertisement

फ्रेंचच्या जागी एलेक्स ग्रीनला संधी

इंग्लंड संघाने एक मोठा बदल केला असून एलेक्स फ्रेंचच्या जागी एलेक्स ग्रीनला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या टीमला गेल्या 28 वर्षांपासून या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. त्यांनी शेवटचा वर्ल्ड कप 1998 मध्ये ओवैस शाहच्या कॅप्टन्सीखाली जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडला अद्याप एकदाही ट्रॉफी उंचावता आलेली नाही. 2022 मध्ये देखील इंग्लंड फायनलमध्ये पोहोचला होता, पण त्यावेळी भारताने त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले होते. यावेळी जुन्या पराभवाचा बदला घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

advertisement

सहाव्यांदा चॅम्पियन होणार?

गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये भारतीय टीमला फायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते. त्या पराभवातून सावरून आता भारतीय टीम सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता या यंग ब्रिगेडच्या कामगिरीवर लागलं आहे.

advertisement

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेस, थॉमस र्यू (विकेटकीपर/कॅप्टन), कॅलेब फाल्कोनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, ॲलेक्स ग्रीन.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरानं बनवला मातीचा कुकर, ना शिट्टी, ना आरोग्याला धोका, 100 वर्षे बिनधास्त
सर्व पहा

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन -आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कॅप्टन), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG U19 World Cup Final : इंग्लंड 28 वर्षांचा दुष्काळ संपवणार? वैभव सूर्यवंशीविरुद्ध उतरवला 18 वर्षांचा घातक खेळाडू!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल