टीम इंडियाचा फ्लडलाइट्समध्ये सराव
भारतीय संघाने 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस रात्री 6 ते 9 या वेळेत फ्लडलाइट्समध्ये सराव केला. विशेष म्हणजे, नामीबियाने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नेदरलँड्सविरुद्ध मॅच खेळली होती. बुधवारी देखील नामीबियाला रात्रीची वेळ न मिळाल्याने कॅनडाच्या टीमने त्या वेळेत सराव केला, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
advertisement
एकही सेशन देण्यात आलं नाही - नामीबिया
इरास्मसने प्रेस कॉन्फरन्समध्ये संताप व्यक्त करताना म्हटले की, "आम्हाला रात्रीच्या वेळी सराव करण्यासाठी एकही सेशन देण्यात आलं नाही, याचं कारण मला माहित नाही. भारताने दोन वेळा रात्री सराव केला आणि आता कॅनडा देखील त्याच वेळी मैदानावर आहे." या परिस्थितीवर प्रेक्षकांनीच विचार करावा, असं सूचक विधानही त्यानं यावेळी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सरावाला रात्रीची वेळ मिळाली नाही
तसं पाहिलं तर, नामीबिया संघाकडे मोठा अनुभव नाही. नामीबियामध्ये फ्लडलाइट्स आणि चांगल्या इंफ्रास्ट्रक्चरची मोठी कमतरता आहे. तिथल्या खेळाडूंना कृत्रिम प्रकाशात खेळण्याचा फारसा अनुभव नाही. केवळ नेपाळ प्रीमियर लीग किंवा ILT20 मध्ये खेळलेल्या काही खेळाडूंकडेच अशा परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. अशा वेळी सरावासाठी रात्रीची वेळ न मिळणे ही नामीबियासाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे आम्हाला रात्रीचा सराव करण्यासाठी वेळ मिळाला, अशी मागणी त्यांनी केली होती.
'नामीबियाई' पद्धतीने फाईट देऊ
दरम्यान, मैदानावर सुविधांची कमतरता असली तरी नामीबियाची टीम पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. "आम्ही आमच्या 'नामीबियाई' पद्धतीने मैदानात फाईट देऊ," असं इरास्मसने ठामपणे सांगितलं अन् टीम इंडियाला चॅलेन्ज दिलं. सरावाच्या वेळावरून झालेला हा वाद आता प्रत्यक्ष मॅचमध्ये किती रंगतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.
