TRENDING:

IND vs PAK Rain : मॅच पहायला घरीच थांबायचं पण वीकेंडला फिरायला जायचं? कोलंबोतून समोर आलं लेटेस्ट Weather Update

Last Updated:

India vs Pakistan Match Weather Update : सामना सुरू होण्यास 8 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs Pakistan Colombo rain prediction : कोलंबोतील प्रसिद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील मॅच रंगणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालंय. टीम इंडिया आणि पाकिस्तानचे खेळाडू सामना खेळण्यासाठी सज्ज असताना पावसाने खोडा घातला तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अशातच आता तुमचा देखील वीकेंड वाया जाऊ नये म्हणून कोलंबोमध्ये सध्या वेदर अपडेट काय आहे? जाणून घ्या.
India vs Pakistan Match Weather Update
India vs Pakistan Match Weather Update
advertisement

पाऊस पडण्याची शक्यता कमी

सामना सुरू होण्यास 8 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. आकाश ढगाळ आहे आणि पावसाची शक्यता वाढतच आहे, परंतु सध्या तरी रिमझिम पाऊस पडत नाही, अशी माहिती कोलंबोमधून समोर आली आहे. तापमान सहनशील क्षेत्रात राहण्याची शक्यता आहे परंतु समुद्राच्या जवळ असल्याने आर्द्रता जास्त असेल.

advertisement

पावसाचा थेंबही पडला नाहीये, मात्र...

कोलंबोमध्ये आकाश ढगाळ आहे परंतु आर प्रेमदासा स्टेडियम असलेल्या भागात अद्याप पाऊस पडलेला नाही, अशी माहिती समोर आलीये. आकाशात दाट ढग जमा झालेत पण पावसाचा थेंबही पडला नाहीये. मात्र, संध्याकाळी सहानंतर तासभर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थोडा उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

advertisement

डगआउटमध्ये एक साप आढळला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख नफा
सर्व पहा

दरम्यान, शनिवारी सराव सत्रादरम्यान पाकिस्तान संघाच्या डगआउटमध्ये एक साप आढळला. सध्याच्या पावसाळी हवामानामुळे आर प्रेमदासामध्ये सापांची संख्या वाढली आहे आणि खेळाडू आणि प्रेक्षकांना सामन्यादरम्यान सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहावे लागू शकते. श्रीलंकेत या मोसमात अनेक खरतनाक प्राणी आढळून येतात, त्यामुळे प्रेक्षकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK Rain : मॅच पहायला घरीच थांबायचं पण वीकेंडला फिरायला जायचं? कोलंबोतून समोर आलं लेटेस्ट Weather Update
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल