कोण होणार बीसीसीआयचा नवा अध्यक्ष?
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार बीसीसीआय या पदासाठी एका दिग्गज क्रिकेटपटूच्या नावाचा विचार करत आहे, ज्याने क्रिकेटच्या मैदानात अनेक रेकॉर्ड मोडली आहेत. सौरव गांगुली 2019 साली बीसीसीआयचा अध्यक्ष बनला होता, यानंतर भारताला 1983 चा वर्ल्ड कप जिंकवून देणारे रॉजर बिनी यांच्याकडे ही जबाबदारी आली होती. आता पुन्हा एकदा क्रिकेटपटूच बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीमध्ये अध्यक्षाच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे.
advertisement
निवडणुकीची शक्यता कमी
हा दिग्गज क्रिकेटपटू अध्यक्षपद स्वीकारणार का नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तसंच अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. अध्यक्षपदाची निवड सर्वसंमतीनेच केली जाणार आहे. बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवाजित सैकिया, कोषाध्यक्ष प्रभतेज भाटिया आणि संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई हे देखील त्यांच्या पदावर कायम राहण्याची शक्यता आहे.
आयपीएल अध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक आणि सध्याचे बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. राजीव शुक्ला पुन्हा एकदा आयपीएल अध्यक्ष बनले, तर बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजप नेते राकेश तिवारी बीसीसीआय उपाध्यक्ष होऊ शकतात.
सप्टेंबरमध्ये होणार बैठक
बीसीसीआयची वार्षिक बैठक सप्टेंबर महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी यांनी जुलै महिन्यात त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा केला, त्यामुळे त्यांना बीसीसीआयच्या सध्याच्या संविधानानुसार या पदावर राहता आलं नाही.