TRENDING:

VIDEO : बुमराहचा खतकनाक रॉकेट थ्रो, राणा डाईव्ह मारूनही वाचला नाही, 10 सेकंदात खेळखल्लास

Last Updated:

मुंबईने लागोपाठ दिल्ली कॅपिटलला दोन मोठे धक्के दिले होते. त्यातल्या त्यात बुमराहच्या त्या रनआऊटची प्रचंड चर्चा रंगली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jasprit Bumrah Run out Nitish Rana : आयपीएलमध्ये आजच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 162 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स समोर 163 धावांचे लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने लागोपाठ दिल्ली कॅपिटलला दोन मोठे धक्के दिले होते. त्यातल्या त्यात बुमराहच्या त्या रनआऊटची प्रचंड चर्चा रंगली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
jasprit bumrah direct hit nitish rana runout
jasprit bumrah direct hit nitish rana runout
advertisement

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि पथून निसांका मैदानात उतरले होते. यावेळी दीपक चहरने त्याच्या पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर के एल राहुलला विकेटमागे कॅच आऊट केले होते.

राहुल बाद होताच मैदानात नितीश राणा आला होता. यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरेल असे वाटत होते. पण याच दरम्यान जसप्रीत बुमराहने त्याला खतरनाक रनआऊट केले.खरं तर ही विकेटच नव्हती.पण नितीश राणाने फुकटात ती दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

त्याचं झालं असं की बुमराहचा चौथ्या बॉलवर नितीश राणाने बॉल प्लेस केला. हे पाहून नॉन स्ट्राईक एंडवरून पथून निसांका पळाला.त्याला पाहून नितीश राणा देखील पळाला. पण त्याच्या धावण्याचा वेग खूपच कमी होता.ही गोष्ट बुमराहच्या लक्षात येताच त्याने बॉल हातात घेऊन थेट रॉकेट थ्रो करत स्टम्प उडवले. नितीश राणाने यावेळी विकेट वाचवण्यासाठी डाईव्ह मारली. पण त्याच्या रॉकेट थ्रो समोर नितीश राणाचे काहीच चालु शकले नाही आणि तो रनआऊट होऊन बसला.नितीश राणा यावेळी शून्य धावावर बाद झाला. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सची 7 धावांवर 2 विकेट अशी बिकट अवस्था झाली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : बुमराहचा खतकनाक रॉकेट थ्रो, राणा डाईव्ह मारूनही वाचला नाही, 10 सेकंदात खेळखल्लास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल