आतापर्यंत 10 वेळा आऊट केलंय
दोन्ही खेळाडूंमधील आतापर्यंतच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर सुनील नारायणचे वर्चस्व स्पष्टपणं दिसून येतंय. रोहित शर्माने नारायणच्या 177 बॉलचा सामना करताना केवळ 189 रन्स केल्या आहेत. विशेष म्हणजे, नारायणने रोहितला आतापर्यंत 10 वेळा आऊट केलं आहे. एका दिग्गज बॅटरला एकाच बॉलरने इतक्या वेळा बाद करणं, ही आकडेवारी रोहितच्या चिंतेत भर घालणारी आहे. तसेच मुंबईचं टेन्शन देखील यामुळे वाढलंय.
advertisement
रोहितचा स्ट्राईक रेट खूपच कमी
सुनील नारायणविरुद्ध खेळताना रोहितचा स्ट्राईक रेट खूपच कमी राहिलाय. हिटमॅनचा स्ट्राईक रेट केवळ 106.77 इतका राहिलाय. रोहितसारख्या आक्रमक बॅटरसाठी हा स्ट्राईक रेट अत्यंत कमी मानला जातो. नारायणच्या मिस्ट्री स्पिनसमोर रोहितला मोकळेपणाने हात उघडता आले नाहीत, हे या आकडेवारीवरून सिद्ध होतंय. तसेच त्याची सरासरी देखील 18.90 इतकी खाली घसरली आहे, जी त्याच्या एकूण कारकिर्दीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
नारायण पुन्हा बाजी मारणार?
दरम्यान, सुनील नारायणच्या चार ओव्हर मुंबई इंडियन्ससाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मुंबई इंडियन्सला उर्वरित 16 ओव्हरमध्ये गेम चेंज करावा लागेल. कारण एका बाजूला हिटमॅनची ताकद असेल तर दुसऱ्या बाजूला नरीनची जादुई फिरकी. आता रोहित या रेकॉर्डमध्ये सुधारणा करणार की नारायण पुन्हा एकदा बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
