पहिल्या 5 ओव्हरमध्ये हैदराबादने फक्त 15 रन करून 3 विकेट गमावल्या. यात मोहम्मद शमीने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 9 रन देऊन 2 विकेट मिळवल्या.
मोहम्मद शमीचा सापळा
अभिषेक शर्माची विकेट घेण्यासाठी मोहम्मद शमीने सापळा रचला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलआधी शमीने स्लिपमध्ये असलेल्या मणीमरन सिद्धार्थला शॉर्ट थर्ड मॅनला पाठवण्यात आलं, त्यानंतर मोहम्मद शमीने 114 किमी प्रती तासाच्या वेगाने स्लो बॉल टाकला. स्लिपचा फिल्डर शॉर्ट थर्ड मॅनला लावल्यानंतर पुढच्याच बॉलला अभिषेक शर्माने त्याच्याच हातात कॅच दिला.
advertisement
शेवटच्या बॉलवर अभिषेकची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने त्याच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला ट्रेव्हिस हेडलाही स्लो बॉल टाकूनच माघारी धाडलं. शमीने स्लो बॉल टाकल्यामुळे हेडचा शॉट चुकला आणि मिड ऑफला उभ्या असलेल्या एडन मार्करमने त्याचा कॅच पकडला. लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट घेतल्यानंतर शमी हॅट्रिकवर होता, पण त्याला हॅट्रिक घेण्यात यश आलं नाही.
35 वर्षांच्या शमीचा कमबॅकसाठी प्रयत्न
35 वर्षांचा मोहम्मद शमी टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी जोरदार मेहनत करत आहे. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20, विजय हजारे ट्रॉफीमध्ये शमीने धमाकेदार कामगिरी केली, यानंतर आता आयपीएलमध्येही शमीचे बॉल आग ओकत आहेत. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच बॉलवर शमीने केएल राहुलचीही विकेट घेतली होती.
