TRENDING:

Mumbai Indians : 'दोघांनी चूक केली...', सूर्याने थेट नाव घेतलं, मुंबईच्या पराभवाचं खापर फोडलं!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे. मुंबईने दिलेलं 163 रनचं आव्हान दिल्लीने 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे. मुंबईने दिलेलं 163 रनचं आव्हान दिल्लीने 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. समीर रिझवी दिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने त्यांच्या पहिल्या 2 विकेट 7 रनवरच गमावल्या होत्या, पण समीर रिझवीने 51 बॉलमध्ये 90 रनची खेळी केली. समीर रिझवीने त्याच्या इनिंगमध्ये 7 फोर आणि 7 सिक्स मारल्या.
'दोघांनी चूक केली...', सूर्याने थेट नाव घेतलं, मुंबईच्या पराभवाचं खापर फोडलं!
'दोघांनी चूक केली...', सूर्याने थेट नाव घेतलं, मुंबईच्या पराभवाचं खापर फोडलं!
advertisement

समीर रिझवीशिवाय पथुम निसांकाने 30 बॉल 44 आणि डेव्हिड मिलरने नाबाद 21 रन केले. मुंबईकडून दीपक चहरला 1, मिचेल सॅन्टनरला 1 आणि कॉर्बिन बॉशला 1 विकेट मिळाली. याआधी पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 162 रन केले. सूर्यकुमार यादवने 36 बॉल 51 आणि रोहित शर्माने 26 बॉल 35 रन केले. दिल्लीकडून मुकेश कुमारला 2 तर एनगिडी, अक्षर पटेल, विपराज निगम आणि नटराजन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

advertisement

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

या सामन्यात मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याऐवजी मैदानात उतरली, त्यामुळे सूर्यकुमार यादवकडे मुंबईची कॅप्टन्सी देण्यात आली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्याने मुंबईचा पराभव नेमका कशामुळे झाला? हे सांगितलं आहे. 'विकेट चांगली होती, आम्हाला खेळपट्टी थोडी संथ वाटली होती, पण तरीही आम्ही 15-20 रन कमी केल्या. मला बॉलरकडूनही कोणतं श्रेय काढून घ्यायचं नाही, दिल्लीच्या बॅटरनी उत्कृष्ट बॅटिंग केली', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

advertisement

'7 रनवर 2 विकेट गेलेल्या असताना अशापद्धतीने बॅटिंग करणं, याचं श्रेय समीर रिझवीला दिलं पाहिजे. त्याने कधीही आम्हाला सामन्यात येऊ दिलं नाही. आम्हाला जे शक्य आहे ते सगळं आम्ही केलं, पण आम्हाला कमबॅक करता आला नाही', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.

नमन-मी चुकीच्या वेळी आऊट झालो

'खेळपट्टी दोन्ही इनिंगमध्ये सारखीच राहिली, पण त्यांनी खूप हुशारीने बॅटिंग केली. त्यांनी परिस्थिती व्यवस्थित जाणून घेतली. हे कडू औषध आम्हाला घ्यावं लागत आहे. 180-185 रन या खेळपट्टीवर चांगला स्कोअर होता, आम्हाला 15-20 रन कमी पडल्या. मी आणि नमन चुकीच्या वेळी आऊट झालो, नाहीतर आमचा स्कोअर जास्त झाला असता', अशी खंतही सूर्याने व्यक्त केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

'स्पर्धेमध्ये असे दिवस येतील, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तरी गोष्टी तुमच्या बाजूने जाणार नाही. आम्ही पुन्हा कठोर मेहनत करून कमबॅक करू,' असा विश्वासही सूर्यकुमार यादवने व्यक्त केला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : 'दोघांनी चूक केली...', सूर्याने थेट नाव घेतलं, मुंबईच्या पराभवाचं खापर फोडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल