आयपीएल 2026 च्या यंदाच्या मोसमातला लखनऊचा हा पहिलाच विजय आहे. या विजयानंतर स्टेडियममध्ये बसलेले लखनऊचे मालक संजीव गोएंका यांना अश्रू अनावर झाले. ऋषभ पंत लखनऊला विजयाच्या जवळ पोहोचवत होता, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले संजीव गोएंका ढसाढसा रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या स्क्रीनवरही हा क्षण दाखवला गेला तेव्हा स्टेडियममध्ये असलेले 55 हजार प्रेक्षक हे स्क्रीनवर पाहत होते.
advertisement
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात लखनऊचा दिल्लीविरुद्ध 6 विकेटने पराभव झाला. या सामन्यानंतर संजीव गोएंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातल्या मैदानातल्या चर्चेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दोघांमध्ये सामना संपल्यानंतर मैदानात वाद झाल्याचा दावाही केला गेला, पण लखनऊ सुपर जाएंट्सने हा दावा फेटाळून लावत मैदानात नेमकं काय झालं? याचा अनफिल्टर व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.
याआधी लखनऊ सुपर जाएंट्सने मालक संजीव गोएंका यांचं तेव्हाचा टीमचा कर्णधार केएल राहुल याच्यासोबतही मैदानात वाद झाल्याचं बोललं गेलं. यानंतर केएल राहुलने लखनऊची साथ सोडली आणि तो दिल्लीच्या टीममध्ये गेला.
ललित मोदींचा गोएंकांवर निशाणा
ऋषभ पंत आणि संजीव गोएंका यांचा मैदानातला व्हिडिओ समोर आल्यानंतर आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी संजीव गोएंका यांच्यावर निशाणा साधला. तसंच मी आयपीएल कमिशनर असतो तर संजीव गोएंका यांच्यावर बंदी घातली असती, असं ललित मोदी म्हणाले.
'लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका लूजर आणि जोकर आहे. मला त्यांच्या या वर्तणुकीमुळे लाज वाटत आहे. मी आयपीएल फॅन्स आणि खेळाडूंना तयार केलं होतं. मी आज आयपीएल कमिशनर असतो तर मी तातडीने गोएंकांवर बंदी घातली असती आणि त्यांच्याकडून टीमचा मालकी हक्क काढून घेतला असता. ते अहंकारी जोकर आहेत. एखादी फ्रॅन्चायजी आयपीएल करार करते तेव्हा अशा वर्तनासाठी नियम आहे. बीसीसीआयने हा नियम लागू करावा. चाहते आणि खेळाडू हे वर्तन कायम लक्षात ठेवतील', अशी टीका ललित मोदी यांनी केली होती.
