गुजरात आणि राजस्थान यांच्यातल्या सामन्याच्या टॉसआधी पदार्पण करणाऱ्या कुमार कुशाग्रला गुजरातच्या टीमची कॅप देण्यात आली तेव्हा कुशाग्र इमोशनल झाला आणि त्याने कॅपचं चुंबन घेतलं. कुमार कुशाग्रची बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया गुजरातचा कर्णधार राशिद खानने दिली.
राजस्थानने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना कुमार कुशाग्र साई सुदर्शनसोबत ओपनिंगला आला, पण 14 बॉलमध्ये 18 रन करून तो माघारी परतला. रियान परागच्या बॉलिंगवर शिमरन हेटमायरने कुमार कुशाग्रचा कॅच पकडला.
advertisement
कोण आहे कुमार कुशाग्र?
कुमार कुशाग्र हा झारखंडचा विकेट कीपर बॅटर आहे. आयपीएल 2025 मध्ये गुजरातने कुमार कुशाग्रला 65 लाख रुपयांना विकत घेतलं. आयपीएल 2024 मध्ये कुमार दिल्लीच्या टीममध्ये होता. दिल्लीने कुमारला आयपीएल लिलावात तब्बल 7.2 कोटी रुपये देऊन विकत घेतलं, पण संपूर्ण मोसमात त्याची कामगिरी निराशाजनक झाली. 2024 मध्ये दिल्लीकडून खेळताना कुमार कुशाग्रने 3 इनिंगमध्ये फक्त 3 रन केल्या, त्यानंतर दिल्लीने त्याला रिलीज केलं.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका
2025 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कुमार कुशाग्रने धमाका केला. कुमार कुशाग्र त्या मोसमात झारखंडचा सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू होता. कुमारने 10 इनिंगमध्ये 4 अर्धशतकांसह 422 रन केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये कुमारने फक्त 38 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली होती. तर कर्णधार इशान किशनने 49 बॉलमध्ये 101 रन केल्या होत्या.
