TRENDING:

'IPL मुळे करिअर बरबाद, शिक्षा मिळाली...', RCB च्या दिग्गजाने बॉम्ब फोडला, मनातलं सगळं बाहेर काढलं!

Last Updated:

आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंची करिअर बनल्याचं अनेकदा समोर आलं आहे, पण दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने मात्र आपलं करिअर आयपीएलमुळे संपल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंची करिअर बनल्याचं अनेकदा समोर आलं आहे, पण दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने मात्र आपलं करिअर आयपीएलमुळे संपल्याचा धक्कादायक दावा केला आहे. आयपीएलमध्ये खेळल्यामुळे माझे क्रिकेट बोर्डासोबतचे संबंध खराब झाले आणि याची शिक्षा मला मिळाली, असं हा क्रिकेटपटू म्हणाला आहे.
'IPL मुळे करिअर बरबाद, शिक्षा मिळाली...', RCB च्या दिग्गजाने बॉम्ब फोडला, मनातलं सगळं बाहेर काढलं!
'IPL मुळे करिअर बरबाद, शिक्षा मिळाली...', RCB च्या दिग्गजाने बॉम्ब फोडला, मनातलं सगळं बाहेर काढलं!
advertisement

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने एका पॉडकास्टमध्ये हा खळबळजनक खुलासा केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड तेव्हा करारबद्ध खेळाडूंना आयपीएल खेळायला पाठवण्यासाठी इच्छुक नव्हतं, पण तरीही मी आयपीएल खेळायला आलो. आयपीएल खेळल्यामुळे माझं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर उद्ध्वस्त झालं, असं वक्तव्य पीटरसनने केलं आहे.

बोर्ड विरोधात गेलं

'मी बरेच त्याग केले, माझं करिअर संपलं. याच कारणामुळे बोर्डातले सगळे माझ्याविरोधात गेले. आयपीएल खेळत असल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबतचे माझे संबंध खराब झाले, पण मी आयपीएल खेळण्यावर ठाम राहिल्यामुळे आज इंग्लंडचे क्रिकेटपटू कोणत्याही निर्बंधांशिवाय आयपीएल खेळत आहेत', अशी प्रतिक्रिया केव्हिन पीटरसनने दिली आहे.

advertisement

केव्हिन पीटरसनने त्याच्या 104 टेस्ट मॅचमध्ये 8,181 रन केले. आयपीएलमुळे माझं करिअर वेगळ्या मार्गावर गेलं, अन्यथा मी 12-13 हजार टेस्ट रन करून निवृत्त झालो असतो, असा दावाही केव्हिन पीटरसनने या पॉडकास्टमध्ये केला आहे. 2009 साली इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना 3 आठवडे आयपीएल खेळायला परवानगी दिली होती, माझी स्टाईल आयपीएल खेळण्यासाठी एकदम परफेक्ट होती. मी आरसीबीसोबत खेळायला प्राथमिकता दिली, त्यामुळे इंग्लंड टीममधल्या माझ्या जागेवर याचा परिणाम झाला. मी खूप मोठं बलिदान दिलं, यात माझं करिअरही संपलं, हे सांगताना केव्हिन पीटरसन इमोशनल झाला.

advertisement

केव्हिन पीटरसनचं आयपीएल करिअर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

केव्हिन पीटरसन आयपीएलमध्ये आरसीबी, दिल्ली आणि पुण्याच्या टीमकडून खेळला. 36 आयपीएल सामन्यांमध्ये पीटरसनने 1001 रन केल्या, ज्यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात पीटरसन दिल्लीचा कोच होता, यंदा मात्र तो आयपीएलची कॉमेंट्री करत आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'IPL मुळे करिअर बरबाद, शिक्षा मिळाली...', RCB च्या दिग्गजाने बॉम्ब फोडला, मनातलं सगळं बाहेर काढलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल