व्हीव्हीएस लक्ष्मण हा बऱ्याच काळापासून बीसीसीआयच्या रडारवर आहे. मागच्या वर्षी गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याआधी या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण पहिली पसंती मानली जात होती, पण लक्ष्मणनी मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारल्याचं वृत्त पीटीआयने दिलं.
गौतम गंभीरची नोकरी धोक्यात?
एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, 'व्हायरल बातम्या सर्व खोट्या आहेत. ही बातमी काल्पनिक आहे. काही प्रमुख वृत्तसंस्था देखील या खोट्या बातम्यांना अतिशयोक्ती देत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही आणि बीसीसीआय ही बातमीला पूर्णपणे नाकारते'.
advertisement
'लोक त्यांना वाटेल तो विचार करू शकतात, पण बीसीसीआयने प्रशिक्षकपदाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही बनावट कथा आहे, ज्यात कोणतेही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे, याशिवाय दुसरं काहीही सांगू इच्छित नाही', असं देवजीत सैकिया म्हणाले. गंभीर प्रशिक्षक असताना टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय टीमची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी मर्यादित ओव्हरमध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तसंच आशिया कपमध्येही विजय मिळवला.
