आदिती नावाच्या मुलीचा उल्लेख
ईशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी 'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या नातवाच्या लग्नाबाबत आणि त्याच्या गर्लफ्रेंडबाबत मोकळेपणाने संवाद साधला. अनुराग पांडे यांनी सांगितले की, ईशानने घरी आदिती नावाच्या मुलीचा उल्लेख केला होता. आदितीने ईशानच्या एका मुलाखतीचे खूप कौतुक केले होते आणि त्याच्या आजोबांबद्दलही आदर व्यक्त केला होता. या खुलाशानंतर भारतीय सलामीवीराच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र
ईशानच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे की, तो आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे. भविष्यात तो ज्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेईल, त्याला कुटुंब पूर्ण सन्मानाने स्वीकारेल. अनुराग पांडे यांनी पुढे सांगितले की, ईशानच्या मोठ्या भावाने देखील आपल्या पसंतीने लग्न केले होते आणि कुटुंबाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे ईशानच्या बाबतीतही घरच्यांची हीच परंपरा कायम राहील, जिथे मुलांच्या आनंदाला आणि पसंतीला सर्वाधिक महत्त्व दिले जाईल.
ईशानची गर्लफ्रेंड कोण?
आदितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आजोबांनी सांगितले की, ती ईशानची गर्लफ्रेंड असून जयपूरची राहणारी आहे. आदिती सध्या मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असून तिने 'मिस इंडिया' स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले होते. ईशान किशन सध्या वर्ल्ड कप खेळण्यात प्रचंड व्यस्त आहे, परंतु त्याच्या खाजगी आयुष्यातील या अपडेटमुळे क्रिकेट फॅन्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता ही जोडी अधिकृतपणे कधी समोर येणार, याची सर्वजण वाट पाहत आहेत.
