खरं तर ही घटना भारताच्या 18 व्या ओव्हर दरम्यान घडली होती. त्यावेळी स्ट्राईकवर कॉर्बिन बॉश होता. बुमराहने बॉशला ब्लॉकहोलला बॉल टाकला. हा बॉल मारण्याच्या प्रयत्नात कॉर्बिन बॉशने थेट बुमराहच्या हातात कॅच देऊन बसला होता.पण बुमराहने कॅच पकडून देखील त्याला ही गोष्ट कळालीच नाही.कारण त्याला वाटल बॉल दुसरा टप्पा होऊन त्याच्यात आला, पण बॉल थेट त्याच्या हातात आला होता.
advertisement
यानंतर बुमराह आपला शेवटचा बॉल टाकायला जात असताना विकेट गमावून ईशाने अपिल केले. त्यानंतर कॅप्टन सूर्याही म्हणाला आऊट आहे. हे पाहून बुमराह आश्चर्यचकीत झाला त्यानंतर रिव्ह्यू घेण्यात आला.आणि या रिव्ह्यूमध्ये बुमराहने स्पष्टपणे कॅच घेतल्याचे दिसले होते. या विकेटचा आता व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर डेवाल्ड ब्रेविसने 45 बॉलमध्ये 29 धावांची खेळी केली होती.तिच्यासोबत डेविड मिलरने 35 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याने तीन षटकार आणि 7 चौकार मारले होते.त्यानंतर शेवटी स्टब्सने 24 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली होती.या बळावर साऊथ आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 187 धावा केल्या होत्या.
