TRENDING:

MI vs DC : रोहित शर्माची चलाखी,कुलदीपला DRS घ्यायला भागं पाडलं;शेवटी हिटमॅन पोट धरून हासला

Last Updated:

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतासाठी खेळताना कुलदीप यादवने अनेकदा अशाप्रकारचा डिआरएस घेतला आहे. पण या डीआरएसमध्ये खुप कमी वेळ त्याला विकेट मिळाली आहे.त्यामुळे रोहितने कुलदीपच्या या सवयीवर त्याला अनेकदा झापलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indians vs Delhi Capitals : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 162 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स समोर 163 धावांचे लक्ष्य आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्माने चलाखी दाखवली आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे कुलदीप यादव तोंडावर पडला आहे.
rohit sharma kuldeep yadav
rohit sharma kuldeep yadav
advertisement

खरं तर कुलदीप यादव हा असा गोलंदाज आहे, ज्याला प्रत्येक बॉलवर डिआरएस हवा असतो,असे रोहित शर्मा एकदा म्हणाला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतासाठी खेळताना कुलदीप यादवने अनेकदा अशाप्रकारचा डिआरएस घेतला आहे. पण या डीआरएसमध्ये खुप कमी वेळ त्याला विकेट मिळाली आहे.त्यामुळे रोहितने कुलदीपच्या या सवयीवर त्याला अनेकदा झापलं आहे.पण आजच्या घटनेत रोहित शर्माला त्याला झापता आलं नाही पण यावेळेस तो पोटधरून हसला आहे.

advertisement

कुलदीप यादवच्या 9 व्या ओव्हरला ही घटना घडली आहे.या घटनेत कुलदीपच्या पाचव्या बॉलवर शॉर्ट मारताना रोहित शर्मा मिस झाला होता. पण या दरम्यान काही तरी आवाज आल्याने विकेट मागून केएल राहुलने अपील केले त्याच्या जोडीला कुलदीप यादव देखील आला. दोघांच्या अपीलनंतर रोहित पव्हेलियनच्या दिशेने निघाला होता,पण दोन पाऊल पुढे टाकताच अंपायरने नॉट करार दिले.

advertisement

त्यानंतर कुलदीपने अक्षरला डीआरएस घ्यायला सांगितलं. पण त्याचा नकार होता. तरी देखील कुलदीपने त्याला डिआरएस घ्यायला भाग पाडलं. शेवटी डीआरएसमध्ये रोहित शर्माच्या बॅटीला कड लागलीच नव्हती.त्यामुळे त्याला नॉटआऊट करार देण्यात आले. त्यामुळे अंपायरचा निर्णय येताच रोहित शर्मा मैदानात पोट धरून हसला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

दरम्यान मुंबईच्या डावानंतर डीआरएसवरून कुलदीप यादव आणि केएल राहुलसोबतच्या एका मजेशीर क्षणाबद्दल रोहित शर्माला विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, "मला माहित आहे की कुलदीपला डीआरएस घ्यायला आवडतो आणि मी माझे नशीब आजमावले.मी फक्त तिथे चालत जाण्याचा प्रयत्न करत होतो, मला माहित आहे की जेव्हा धावसंख्या ५०-५० असते तेव्हा कुलदीप रिव्ह्यू घेतो पण मी जास्त वेळ फलंदाजी करू शकलो नाही, नंतर आऊट झालो,असे रोहितने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs DC : रोहित शर्माची चलाखी,कुलदीपला DRS घ्यायला भागं पाडलं;शेवटी हिटमॅन पोट धरून हासला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल