छत्तीसगडविरुद्ध शार्दुल ठाकूरचा कहर
मुंबईचा कॅप्टन दुसरा तिसरा कुणी नसून शार्दुल ठाकूर आहे. पनवेल एक्सप्रेसने आपल्या टॅलेन्टची नवी ओळख पुन्हा एकदा करून दिली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर शार्दुल ठाकूर याने सुरुवातीलाच आपली चमक दाखवली. त्याने छत्तीसगडच्या टॉप ऑर्डरला पूर्णपणे उद्ध्वस्त करत आपल्या 5 ओव्हरच्या स्पेलमध्ये 4 महत्त्वाचे बळी टिपले. शार्दुलच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे अवघ्या 17 ओव्हरमध्ये छत्तीसगडची अवस्था 4 विकेट्स गमावून 64 रन अशी दयनीय झाली होती.
advertisement
छत्तीसगडचा डाव गडगडला
छत्तीसगडचा संघ अवघ्या 147 धावांवर ऑलआऊट झाला. छत्तीसगडकडून फक्त अमनदीप खरे याला चांगली कामगिरी करता आली. कॅप्टन अमनदीपने 63 धावांची आक्रमक खेळी केली. तर अजय मंडल याने 47 धावा कोरल्या. याशिवाय कोणत्या खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. एवढंच नाही कोणालाही दुहेरी आकडा गाठटा आला नाहीय.
अंगरिक रघुवंशीची वादळी खेळी
मुंबईकडून आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळत नाही. तर अंगरिक रघुवंशी याने आक्रमक सुरूवात केली असून त्याने 68 धावांची खेळी केली. तर सिद्देश लाड याने देखील अर्धशतक झळकावलं आहे. मुंबईकडून तुषार देशपांडेला मात्र विकेट मिळाली नाही.
