चेन्नईच्या हातातून मॅच गेली
सुरूवातीला हळूवार सुरुवात झाल्यानंतर आरसीबीने गियर चेंज केले अन् फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने आक्रमण केलं. त्यानंतर पेड्डीकलने अन् रजतने बॉलला हवेत ठेवणं पसंत केलं अन् सिक्सचा पाऊस पाडला. त्यानंतर आलेल्या टीम डेव्हिडने तर कहरच केला. टीम डेव्हिडने आरसीबीच्या बॉलर्सला धू धू धुतलं अन् 70 धावांची आक्रमक खेळी केली. कॅप्टन रजत पाटीदारने देखील या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. त्याने अवघ्या 19 बॉल्समध्ये नाबाद 48 रन्सची झंझावाती खेळी केली. पण यावेळीच चेन्नईच्या हातातून मॅच गेली. मॅचची 18 वी ओव्हर घेऊन अंशुल कंबोज आला.
advertisement
अंशुल कंबोजचा नो बॉल पडला भारी
अंशुल कंबोजने 18 व्या ओव्हरमध्ये टाईट बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला पण टीम डेव्हिडने सुट्टी दिली नाही. तोपर्यंत आरसीबी 200 धावांवर पोहोचली होती, पण ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अंशुलने टीम डेव्हिडची विकेट उडवली. डेव्हिडचा दांड्या उडाल्या. पण अंपायरने अंशुलची चूक लगेच ओळखली. अंशुलने नो बॉल टाकला होता अन् टीम डेव्हिलला जीवनदान मिळालं. याचनंतर टीम डेव्हिडने आक्रमक खेळी केली अन् 250 धावांचा डोंगर उभा केला.
दोन्ही सलामीवीर चुकीचा शॉट खेळून आऊट
दरम्यान, आरसीबीने 250 धावांचा डोंगर उभा केल्याने सीएसकेचं मनोबल खचलं. ऋतुराज आणि संजू दोन्ही सलामीवीर चुकीचा शॉट खेळून आऊट झाले. चेन्नईच्या हावभावावरून टीम पूर्णपणे खचल्याचं दिसून आलं होतं. चेन्नईचे तिन्ही टॉप ऑर्डर खेळाडू आऊट झाल्याने चेन्नईला अखेरपर्यंत झुंज देऊन देखील विजय मिळवता आला नाही.
