स्वातंत्र्य दिनी भारताकडून शतक झळकावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. 2019 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना विराट कोहलीने हा विक्रम केला होता, जो अजूनपर्यंत कुणालाच मोडता आलेला नाही. विराटने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सीरिजच्या शेवटच्या वनडेमध्ये शतक ठोकलं होतं. खरंतर ही मॅच 14 ऑगस्टला सुरू झाली, पण पावसामुळे 15 ऑगस्ट (भारतीय वेळेनुसार) ला या सामन्याचा निकाल लागला.
advertisement
पावसामुळे मॅचची दुसरी इनिंग रात्री 12 नंतर सुरू झाली त्यानंतर विराट कोहलीने खणखणीत शतक ठोकलं. विराटने 99 बॉलमध्ये नाबाद 114 रन केले, ज्यात 14 फोरचा समावेश होता. विराटने या इनिंगमध्ये 115.15 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. विराटच्या या शतकाच्या जोरावर भारताने 15 ऑगस्टच्या दिवशी दणदणीत विजय मिळवला.
पहिले बॅटिंग करणाऱ्या वेस्ट इंडिजने टॉस जिंकून 35 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 240 रन केले. यात क्रिस गेलने 41 बॉलमध्ये 72 रनची खेळी केली. तर खलील अहमदने भारतासाठी 3 विकेट मिळवल्या. पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला 35 ओव्हरमध्ये 255 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 15 बॉल शिल्लक असताना 6 विकेट गमावून केला. कोहलीच्या शतकाशिवाय श्रेयस अय्यरने 65 रनची खेळी केली.