त्याचं झालं असं की पाकिस्तान खेळाडूंची हॉटेलमधली बुकींगच झाली नसल्याने त्याची हॉटेलमधून हकालपट्टी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रस्त्यावर भटकण्याची आणि आराम करण्याची वेळ आली होती. ऑस्ट्रेलियामध्ये ही घटना घडली आहे.
पाकिस्तानची हॉकी टीम सध्या एआयएच प्रो लीग ही स्पर्धा खेळते आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामना खेळण्यासाठी पाकिस्तानची टीम होबार्डला पोहोचली होती. खरं तर पाकिस्तानला टीमला पाकिस्तानच्या हॉकी फेडरेशन आणि पाकिस्तानच्या स्पोर्टस बोर्डने आधीच माहिती दिली होती. तुमच्यासाठी फोर स्टार हॉटेलमध्ये बुकींग केली आहे. त्यानुसार टीम आणि सपोर्ट स्टाफ हॉटेलमध्ये पोहोचले होते. पण ज्यावेळेस पाकिस्तानी टीम हॉटेलला पोहोचली तेव्हा कोणतीच बुकींग नाही आहे आणि कोणतेच आगाऊ पैसे दिले गेल नाही आहेत,असे म्हणत पाकिस्तानी टीमची हकालपट्टी केली होती.
advertisement
पाकिस्तानी हेड कोच ताहीर जमाने पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण वेळेचा अभाव आणि निधीची कमतरता असल्याने तासनतास काहीच उपाय सापडला नाही. त्यात लांब प्रवासामुळे खेळाडूंना विश्रांतीसाठी किंवा जेवणासाठी जागा नव्हती. शेवटी, खूप प्रयत्नांनंतर, हॉटेलने मर्यादित खोल्या उपलब्ध करून दिल्या. खोल्यांच्या कमतरतेमुळे, दोन किंवा तीन खेळाडूंना एकाच खोलीत राहावे लागले. दुसऱ्या दिवशी, संघाला मैदानावर परतावे लागले, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे ही घटना समोर येताच पाकिस्तानची मोठी नाचक्की समोर आली आहे.
