खरं तर रणजी ट्ऱॉफी स्पर्धेत आंध्रप्रदेश आणि बंगालमध्ये क्वार्टर फायनल सामना सूरू आहे. या क्वार्टर फायनल सामन्यातील पहिल्या डावात बंगालने 629 धावा केल्या होत्या. यामध्ये सुदीप घरामीचं एकट्याच 299 धावांचं योगदान होतं. त्यानंतर सुमंता गुप्ताने 81 धावांची तर शकीब हबीब गांधीने 95 धावांची खेळी केली होती.
या खेळीसोबत बंगालकडून रणजी खेळणाऱ्या मोहम्मद शमीचीही बॅट तळपली होती. मोहम्मद शमीने 33 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 7 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 160 होता. शमीच्या या खेळीच्या बळावर बंगालने पहिल्या डावात 629 धावा केल्या होत्या.
आता आंध्रप्रदेशने चौथ्या दिवसअखेर 64 धावांवर तीन विकेट गमावले आहेत. याआधी पहिल्या डावाच आंध्र प्रदेशने 295 धावा केल्या होत्या. यावेळी मुकेश कुमारने 5, आकाशदिपने 4 तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली होती.
