चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी सामन्याची पहिली ओव्हर टाकायला खलील अहमद आला होता. खलील अहमदच्या ओव्हरच्या पाचव्याच बॉलला विराट कोहली हा आऊट झाला असता. पण विराट कोहलीचा शिवम दुबेने कॅच ड्राप केला होता.त्यामुळे शिवम दुबेकडून मोठी चूक झाली होती.
advertisement
यानंतर कोहलीला मिळालेल्या या जीवनदानानंतर बरोबर 27 वी बॉलनी म्हणजेच अंशुल कंबोजच्या चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला कोहलीने पुन्हा दुबेच्या दिशेने बॉल मारला. यावेळी दुबेने कोणतीही चूक न करता जबरदस्त कॅच घेतली. या कॅचनंतर दुबेने राग व्यक्त केला आणि अग्रेशन दाखवलं.त्यामुळे कोहलीची कॅच घेताच दुबेने आपली चूकही सुधारली आणि रागही व्यक्त केला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (डब्ल्यू), रुतुराज गायकवाड (क), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (क), जितेश शर्मा (डब्ल्यू), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी
