शेवटच्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 15 रन्सची गरज
मॅचच्या निर्णायक क्षणी डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग कुणाकडून करून घ्यायची, हा सर्वात मोठा प्रश्न राजस्थानसमोर होता. शेवटच्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 15 रन्सची गरज असताना मी एक मोठी रिस्क घेण्याचं ठरवलं, असं रियान पराग म्हणाला. त्याने आपल्या बॉलरना शक्य तितक्या वेगानं आणि आक्रमकपणे बॉलिंग करण्याचा सल्ला दिला. जर हा प्लॅन यशस्वी झाला तर त्याचे श्रेय खेळाडूंनाच जाईल, असं त्याचं मत होतं. त्याचवेळी विकेटकीपर ध्रुवने मला एक सल्ला दिला अन् आम्ही निर्णय घेतला, असं रियान पराग म्हणाला.
advertisement
जोफ्रा आर्चरला बॉलिंग देण्याचा सल्ला
विशेष म्हणजे, सुरूवातीला 19 व्या ओव्हरसाठी कॅप्टनचा प्लॅन काहीसा वेगळा होता, परंतु ध्रुव जुरेलने दिलेल्या सल्ल्यामुळे सर्व गणितं बदलली. जुरेलने 19 व्या ओव्हरसाठी जोफ्रा आर्चरला बॉलिंग देण्याचा सल्ला दिला अन् ती रणनिती यशस्वी ठरली. कॅप्टनने जुरेलच्या प्रेझेन्स ऑफ माईंडचं कौतुक केलं असून, योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे मॅच राजस्थानच्या बाजूने झुकली, असं देखील रियान पराग म्हणाला.
ध्रुव जुरैलच्या बॅटिंगचं कौतुक
रियान परागने यावेळी ध्रुव जुरैलच्या बॅटिंगचं देखील कौतुक केलं. आम्ही त्याच्या टॅलेन्टला इतकं महत्त्व देऊ शकलो नाही पण आता त्याला पूर्ण संधी मिळाली आहे. त्याला नंबर 3 वर खेळवण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरला. जुरेलने मिळालेल्या संधीचे सोनं करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. या सीझनमध्ये ध्रुवने 700 ते 800 रन्स करावेत आणि टीमला चॅम्पियन बनवावं, अशी इच्छा देखील जाताजाता रियानने व्यक्त केली.
