या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर कर्णधार शार्दुल ठाकूरच्या बॉलने आग ओकली. फास्ट बॉलरना मदत करणाऱ्या या खेळपट्टीचा शार्दुलने पुरेपुर फायदा उचलला. पहिल्याच ओव्हरमध्ये शार्दुलने 2 विकेट घेतल्या, त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये त्याने आणखी 2 विकेट मिळवल्या, त्यामुळे छत्तीसगडची टॉप ऑर्डर कोसळली. शार्दुलने 3 ओव्हरमध्येच 4 विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे छत्तीसगडचा स्कोअर पहिल्या 5 ओव्हरमध्ये 10 रनवर 4 विकेट असा होता.
advertisement
मुलानीच्या स्पिनसमोर लोटांगण
छत्तीसगडचा कर्णधार अमनदीप खरे (63 रन) आणि अजय मंडल (46 रन) यांनी पाचव्या विकेटसाठी 105 रनची पार्टनरशीप केली. पण त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिन बॉलिंगची जादू चालली, त्यामुळे छत्तीसगडचा 38.1 ओव्हरमध्येच 142 रनवर ऑलआऊट झाला. शम्स मुलानीने शेवटच्या 6 पैकी 5 विकेट घेतल्या. मुलानीला त्याच्या 5 विकेट 31 रन देऊन मिळाल्या. छत्तीसगडने त्यांच्या शेवटच्या 6 विकेट फक्त 27 रनमध्येच गमावल्या.
अंककृष-सिद्धेशने मिळवून दिला विजय
या आव्हानाचा पाठलाग करताना अंगकृष रघुवंशी याने 66 बॉलमध्ये नाबाद 68 आणि सिद्धेश लाडने 42 बॉलमध्ये नाबाद 48 रन केले, या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 102 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे मुंबईने फक्त 24 ओव्हरमध्येच 9 विकेटने हा सामना जिंकला. इशान मुलचंदानीच्या रुपात मुंबईने एकमेव विकेट गमावली, जो 19 रनवर हर्ष यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. मुंबई 3 सामन्यांमध्ये 3 विजयांमुळे 12 पॉईंट्ससह ग्रुप सीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
